• Download App
    CYCLONE SHAHIN : सावधान! गुलाबनंतर आता 'शाहिन' चक्रीवादळ ; IMD नं दिला मोठा इशारा । After Gulab, another cyclone ‘Shaheen’ may form over Arabian sea predicts IMD

    CYCLONE SHAHIN : सावधान! गुलाबनंतर आता ‘शाहिन’ चक्रीवादळ ; IMD नं दिला मोठा इशारा

    • शाहीन चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होणार आहे. या चक्रीवादळाला ‘शाहीन’ असं नाव देण्यात आलं आहे.

    • महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असं असणार आहे. After Gulab, Another Cyclone ‘Shaheen’ May Form Over Arabian Sea Predicts IMD

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे (Gulab cylone Affect) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्रप्रदेशसह, ओडिशा आणि महाराष्ट्राला अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) फटका बसला आहे. हे संकट कायम असताना महाराष्ट्रासह (Maharashtra) गुजरात (Gujrat) राज्याला आणखी एका चक्रीवादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं (IMD Alert) दिला आहे.

    सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडतोय. महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून विदर्भासहीत अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. राज्यात पुढील ४८ तासांत या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे.

    शाहिन येतोय-

    महाराष्ट्र आणि गुजरातकडे शाहीन चक्रीवादळ (Shahin Cyclone in Maharashtra) कूच करत असल्याचा अंदाज IMD नं वर्तवला आहे. पुढील काही दिवसांत शाहीन वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल, असा इशारा IMD नं दिला आहे.

    ओमानने दिलंय नाव शाहिन-

    पुढील २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. इतकच नाही तर नाहीसं झालेलं हे ‘गुलाब’ चक्रवादळ पुन्हा नव्याने जन्म घेण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय. महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असं असणार आहे.
    हे नाव ओमानने दिलेलं आहे.

    अशा स्थितीत महाराष्ट्र आणि गुजरातसाठी पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत पोहोचणार आहे. ते 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. तिथे ते आल्यानंतर त्याचं रुपांतर वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) म्हटलं आहे. या वादळाच्या हालचालींवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं IMD नं म्हटलं आहे.

    After Gulab, another cyclone ‘Shaheen’ may form over Arabian sea predicts IMD

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!