• Download App
    गिरीश बापट जाऊन दोनच दिवस झालेत, तरी पोटनिवडणुकीची माध्यमांना घाई; भाजपला कसब्यासारखी भीती वाटल्याची "सूत्रां"च्या हवाल्याने बातमी!!After girish bapat's death marathi media in a hurry to carry pune loksabha constituency byelections

    गिरीश बापट जाऊन दोनच दिवस झालेत, तरी पोटनिवडणुकीची माध्यमांना घाई; भाजपला कसब्यासारखी भीती वाटल्याची “सूत्रां”च्या हवाल्याने बातमी!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन दोनच दिवस झाले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही, तरी या पोटनिवडणुकीची मराठी माध्यमांनाच प्रचंड घाई झाल्याचे त्यांनी दिलेल्या बातम्यांमधून दिसून येते आहे, इतकेच नाही तर काही मराठी माध्यमे त्यांच्या “सूत्रां”च्या हवाल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला कसब्याची पुनरावृत्ती घडण्याची भीती वाटत असल्याच्या बातम्या करून मोकळी झाली आहेत. After girish bapat’s death marathi media in a hurry to carry pune loksabha constituency byelections

    – गिरीश बापटांचे सिलेक्टिव्ह गुणवर्णन

    गिरीश बापट यांच्या निधनानंतर मराठी माध्यमांनी ज्या विविध बातम्या केल्या, त्यामध्ये बापटांच्या राजकीय नेतृत्व कौशल्याची स्तुती जरूर केली आहे. तसे त्यांचे नेतृत्व कुशल होतेच. पण बापटांच्या स्वतःच्या पक्षाच्या निष्ठेपेक्षा बापटांची इतर पक्षांच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी मैत्री कशी होती, याचे “कौशल्यपूर्ण” वर्णन मराठी माध्यमांनी जास्त केले आहे. बापट हे भाजपचे आणि त्या आधीच्या जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते होते. नगरसेवक पदापासून ते खासदार पदापर्यंत त्यांनी 40 वर्षे भाजपमध्ये राहून लोकसेवा केली. पण यावर भर देण्यापेक्षा बापट हे कसे “सर्वपक्षीय” नगरसेवक, आमदार खासदार होते, यावर मराठी माध्यमांनी भर दिला आहे.



     

    … आणि बापटांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा निवडणुकीत पोटनिवडणुकीत भाजपला कसबा मतदारसंघाची पुनरावृत्ती होण्याचा “धोका” वाटत असल्याची भीती याच मराठी माध्यमांनी “सूत्रां”च्या हवाल्याने सांगितली आहे. बापटांनंतर त्यांची सून स्वरदा केळकर यांच्या उमेदवारीची चर्चा मराठी माध्यमांनी सुरू केली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजपला पराभवाचा धक्का बसला, असे मराठी माध्यमांचे स्वघोषित निष्कर्ष आहेत. त्यामुळे भाजप पुणे लोकसभा मतदारसंघात “पॉलिटिकल रिस्क” घेणार नाही बापटांच्या सुनेलाच तिकीट देईल, असा मराठी माध्यमांचा होरा आहे. अर्थात भाजपमधून याला कोणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही
    पण त्याच वेळी मुरलीधर मोहोळ, माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आमदार सिद्धार्थ शिरोळे वगैरे नावे मराठी माध्यमांनी भाजप उमेदवारीच्या चर्चेत आणली आहेत.

    काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीची चुरस

    काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोहन जोशी, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी मान्य झाली तर वंदना चव्हाण आणि प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीची चर्चा माध्यमांनी रंगविली आहे. प्रत्यक्षात यापैकी कोणीही अधिकृतरित्या समोर येऊन आपल्या उमेदवारीची घोषणा केलेली नाही तसेच स्वतःहून काहीही सूचितही केलेले नाही. मराठी माध्यमांनी या सर्व बातम्या त्यांच्या “सूत्रां”च्या हवाल्यानेच दिल्या आहेत!!

    त्यामुळे ज्यांना प्रत्यक्षात पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवायची आहे त्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापेक्षा मराठी माध्यमांनाच पुणे लोकसभेच्या पोटनिवडणूकीची घाई झाली आहे, हे दिसून येत आहे.

    After girish bapat’s death marathi media in a hurry to carry pune loksabha constituency byelections

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!