• Download App
    रोहित पवारांना पाच वर्षांनंतर आला भाऊ पार्थच्या पराभवाचा कळवळा, पण "बदला" घेण्यात अजितदादाच आलेत अडथळा!! After five years, Rohit Pawar felt the pain of his brother Parth's defeat

    रोहित पवारांना पाच वर्षांनंतर आला भाऊ पार्थच्या पराभवाचा कळवळा, पण “बदला” घेण्यात अजितदादाच आलेत अडथळा!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांना तब्बल पाच वर्षांनंतर आलाय भाऊ पार्थच्या पराभवाच्या कळवळा, पण त्यांच्या “बदला” घेण्याच्या भाषेत अजितदादांचा आलाय अडथळा!! After five years, Rohit Pawar felt the pain of his brother Parth’s defeat

    रोहित पवारांना पार्थ पवारच्या 2019 च्या पराभवाचा मावळ मध्ये जाऊन बदला घ्यायचा आहे तशी भाषा त्यांनी वापरली आहे मी पार्थला भाऊ म्हणून सांगतो, त्याचा पराभव मी विसरलो नाही. त्याच्या बदला घेण्यासाठी मी मावळमध्ये आलो आहे, पण नेमका अजितदादाच ज्यांनी पार्थचा पराभव केला, त्यांच्या प्रचाराला उतरले आहेत, असे रोहित पवारांनी सांगितले.



    2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना अजितदादा आणि सुनेत्र पवारांच्या आग्रहाखातर शरद पवारांनी पार्थ पवारला मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु मोदी लाटेत पार्थच्या रूपाने पहिल्यांदा जनतेच्या निवडणुकीत पवारांना धक्का बसला आणि पार्थचा पराभव झाला. पण नंतरच्या काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्यांवरून फार मोठे राजकीय पाणी वाहून गेले आणि अजितदादा थेट मोदींच्या गोटात दाखल झाले. गेल्या पाच वर्षांमध्ये रोहित पवारांना पार्थ पवारचा पराभव आठवला नव्हता, पण आता अजितदादा मोदींच्या गोटात दाखल झाल्याबरोबर रोहित पवारांना पार्थ पवारच्या पराभवाच्या कळवळ आला आणि त्यांनी त्या पराभवाचा बदला घेण्याची भाषा सुरू केली. आज मावळमध्ये पार्थ पवारचा पराभव करणारेच श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी अजित पवार मावळमध्ये फिरले आहेत पार्थ पवारच्या त्या पराभवाच्या जुन्या जखमा अजितदादांच्या दृष्टीने भरल्या आहेत, पण रोहित पवारांनी त्या जखमेवरची खपली काढून पार्थ पवारच्या पराभवाचा “बदला” घेण्याची भाषा केली आहे.

    रोहित पवार म्हणाले

    पार्थला भाऊ म्हणून सांगतो, 2019 ला पार्थ मावळ लोकसभा मतदार संघात उभा होता. त्यावेळी महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता. पार्थ याचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. तो पराभव पार्थ विसरला नसेल. त्याचा भाऊ म्हणून मी आज येथे प्रचाराला आलो आहे. परंतु मुलाचा पराभव करणाऱ्याच्या विजयासाठी अजित पवार आले आहेत. ते कुठल्या पातळीवर गेले आहेत, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला.

    जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, जयला विनंती करायची आहे. त्याने भाजपची सवय लावू घेऊ नये. भाजप सारखे खोटे बोलणार तुझी प्रतिमा करु नको. पार्थ पवार यांना दिलेल्या सुरक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी टीका केली. इकडे कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. गुन्हेगारी वाढत आहे. त्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही देणे घेणे नाही. पार्थला वाय कशाला झेड सुरक्षा द्या, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

    After five years, Rohit Pawar felt the pain of his brother Parth’s defeat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!