ICSE ISC Exams : कोरोना महामारीच्या देशात वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच CISCEने आयसीएसई (इयत्ता 10वी) आणि आयएससी (इयत्ता 12वी) च्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. परीक्षांच्या नव्या तारखांबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. After CBSE, ICSE ISC Exams also cancelled
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या देशात वाढलेल्या प्रादुर्भावामुळे कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच CISCEने आयसीएसई (इयत्ता 10वी) आणि आयएससी (इयत्ता 12वी) च्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. परीक्षांच्या नव्या तारखांबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
CBSEने नुकत्याच 10वीच्या परीक्षा रद्द करण्याबरोबरच 12वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. आता CISCE कडून ICSE (10वी) आणि ISC (12वी) च्या बोर्ड परीक्षां स्थगित करण्यात आल्या आहेत. CISCE चे मुख्य कार्यकारी आणि सचिव जी. एराथून यांनी याबाबत माहिती दिली आहे.
एका वृत्तानुसार, इयत्ता 12वीच्या परीक्षांबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वैकल्पिक असेल. इयत्ता 10 वीचे जे विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छित नाहीत, त्यांच्या निकालासाठी CISCE एक निश्चित मानदंड ठरवणार आहे.
After CBSE, ICSE ISC Exams also cancelled
महत्त्वाच्या बातम्या
- Tesla Cars India : टेस्लाने भारतात कारचे उत्पादन केले, तर आम्ही मदतच करू! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- Nirav Modi Extradition : ब्रिटन सरकारच्या मंजुरीनंतरही लांबू शकते नीरव मोदीचे प्रत्यार्पण, हे आहे कारण
- योगी सरकारचे जबरदस्त निर्णय, कोरोनाच्या निर्बंधांसोबतच गरिबांना रोख मदत, मोफत रेशनचीही सोय
- केंद्रीय गृहमंत्रालयात 50 टक्केच उपस्थिती ; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना
- West Bengal assembly elections, प्रचाराच्या वेळेला कात्री; ४८ तास नव्हे, ७२ तास आधी प्रचार संपविणार; निवडणूक आयोगाचे नवे कठोर निर्बंध