सुमारे १० वर्षापासून असलेले प्रेमसंबंध दोघांमध्ये भाडंण झाल्याने तुटले. तेव्हापासुन ती त्याच्याशी बोलत नव्हती. याचा राग मनात ठेवून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बियरच्या रिकाम्या बाटलीने मारण्यासाठी तीच्या अंगावर धावुन जावु लागला. त्याला अडवण्यासाठी गेलेल्या तिचे आईच्या तोंडावर व डोक्यात बॉटल लागल्याने आई गंभीर जखमी झाली आहे. After breakup girl not talk with youth, the youth angry and beaten the girl mother
विशेष प्रतिनिधी
पुणे : सुमारे १० वर्षापासून असलेले प्रेमसंबंध दोघांमध्ये भाडंण झाल्याने तुटले. तेव्हापासुन ती त्याच्याशी बोलत नव्हती. याचा राग मनात ठेवून तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बियरच्या रिकाम्या बाटलीने मारण्यासाठी तीच्या अंगावर धावुन जावु लागला. त्याला अडवण्यासाठी गेलेल्या तिचे आईच्या तोंडावर व डोक्यात बॉटल लागल्याने आई गंभीर जखमी झाली आहे.
पिडीत तरूणीच्या जखमी आईने दिलेल्या फिर्यादी वरून दिपक मनोहर शितोळे (वय ३२, रा. इंदिरानगर, थेऊर, ता. हवेली,पुणे) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत तरूणी व तिचा मित्र दिपक यांचे सुमारे १० वर्षापासून प्रेमसंबंध होते. २७ मार्च रोजी दोघांमध्ये भाडंण झाले. तेव्हापासुन ती त्याच्याशी बोलत नव्हती. तो तिच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. परंतू ती प्रतिसाद देत नव्हती. चार एप्रिल रोजी पिडीता तिची आई व आजी घरासमोरील ओटयावर गप्पा मारत बसले होते. पहाटे २ वाजण्याच्या सुमारांस दिपक शितोळे तेथे आला. व तिला शिवीगाळ करत तु माझा फोन का उचलत नाही, तु जाशील कोठे ? असे म्हणाला.
तिचे आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिलाही त्याने शिवीगाळ करुन तुम्ही लोक धंदा करता असे बोलुन हाताने लाथाबुक्याने मारहान करु लागला. तेथे जवळच बियरची रिकाम्या बाटली पडली होती. ती घेवुन तो तरुणीचे अंगावर धावून गेला. तेव्हा तिची आई त्याला अडवण्यासाठी गेली असता त्यांने त्याच्या हातातील बाटली तिचे तोंडावर व डोक्यात मारली. व तुम्हाला संपुन टाकीन असे म्हणुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देवु लागला. तेथे तरूणीचे दोन मामा आले. व त्यांनी भांडणे सोडवली. बाटली लागलेने आईचे तोंडातुन व डोक्यातुन रक्त येत असल्याने तिला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
After breakup girl not talk with youth, the youth angry and beaten the girl mother
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशामध्ये भविष्यात अराजक; स्वामी यांचा केंद्राला इशारा
- Anil Deshmukh CBI : सीबीआयने घेतला अनिल देशमुखांचा ताबा!!
- BJP Growth : 42 वर्षे – 900% मतदार – खासदार 15000% वाढ!!; चिनी कम्युनिस्ट पक्षावरही मात!!
- Raut – Somaiya : विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटली 58 कोटींची रक्कम; राऊतांचा सोमय्यांवर देशद्रोहाचा आरोप!!
- प्रियंका चोप्राने लॉस एंजेलिसमधील मॅनहोलच्या ; ‘मेड इन इंडिया कव्हर’चा फोटो केला शेअर
- नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये घेतली शपथ