प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पर फेक झाल्यानंतर पोलिस खवळले असून त्यांनी कठोर भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री पोलिसी बळाचा वापर करून आझाद मैदानावरून बाहेर काढले आणि त्यानंतर ता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून देखील हुसकावून लावले आहे.After Azad Maidan, ST personnel were also chased away from CSMT station
शरद पवार यांच्या घरावर दगडफेक आणि चप्पल फेक झाल्यानंतर आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून मध्यरात्री बाहेर काढले. सर्व एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हटवून सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर बसवण्यात आले.
पण त्यानंतर आंदोलकांना सीएसएमटी स्टेशनवरूनही हुसकावण्यात आले आहे. तिकीट असेल तरच प्लॅटफॉर्मवर बसा अशा सूचना आंदोलकांना देण्यात आल्या. आंदोलकांची तिकीट तपासणी करून नंतर त्यांना बाहेर काढले. काल आझाद मैदानातून हुसकावल्यानंतर आंदोलक सीएसएमटी स्टेशनवर ठिय्या मांडून बसले होते, पण आता पोलीस त्यांना यलो गेट पोलीस स्थानकात घेऊन जात आहेत.
5 कर्मचारी कुठे गेले?
दरम्यान, आझाद मैदानातून मध्यरात्री पोलिसांनी 5 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आता त्यांची कुठलीच माहिती मिळत नाही. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचा आरोप एका आंदोलक महिलेने केला आहे. यावेळी आंदोलकांना अश्रू अनावर झाले होते. आमचे सहकारी कुठे गेले, त्यांना कुठे नेण्यात आले?, असे प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले आहेत.
After Azad Maidan, ST personnel were also chased away from CSMT station
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्याने दबावतंत्र; आमच्या जीवाला धोका; गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांचा आरोप
- भारत एक प्रबळ राष्ट्र ; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक
- शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अजिबात समर्थनीय नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा , मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
- सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी परकीय योगदान कायद्यात दुरुस्ती गरजेचीच, सर्वोच्च न्यायालयाने कायद्याला दिली मंजुरी
- जे कर्म करतो, ते या जन्मीच फेडावं लागतं, उदयनराजे यांची शरद पवार यांच्यावर टीका