- अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. after Amrawati Now carfuew In Akot Of Akola District After Violence Over Tripura Fake Incident
विशेष प्रतिनिधी
अकोला : अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
त्रिपुरातील कथित हिंसक घटनेचे राज्यात अनेक भागांत हिंसक पडसाद उमटले. अमरावती, नांदेड, परभणी, भिवंडी, मालेगावमध्ये या घटनेचे हिंसाचार झाला. अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू होता. त्यामुळे अमरावतीत कालच चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे भाग वगळता राज्यात सर्वत्र शांतता होती.
अकोला जिल्ह्यातही सर्वत्र शांतता असतानाच अकोटमध्येही दगडफेक घडली. काल अकोट शहरातील हनुमान नगर आणि नवगाजी प्लॉट येथे दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांनी अकोटमध्ये 13 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 14 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत आरोग्य सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच कुणालाही या कालावधीत बाहेर फिरता येणार नाही. शिवाय पाचपेक्षा अधिक लोकं एकत्रं आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
भाजप नेते अनिल बोंडे पोलिसांच्या ताब्यात
अमरावतीमध्ये काल पुकारलेल्या बंदमदरम्यान भाजपचे नेतेही सहभागी झाले होते. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे हेसुद्धा या बंदमध्ये सहभागी होते. पोलिसांकडून भाजपच्या या नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या महिला अध्यक्ष निवेदिता चौधरी तसेच भाजपचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
after Amrawati Now carfuew In Akot Of Akola District After Violence Over Tripura Fake Incident
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी