• Download App
    24 तासांनंतर उपरती : केंद्रानंतर महाराष्ट्रातही पेट्रोल - डिझेलची दर कपात!! पण किती??After 24 hours, after Center: Petrol-diesel price reduction in Maharashtra too

    24 तासांनंतर उपरती : केंद्रानंतर महाराष्ट्रातही पेट्रोल – डिझेलची दर कपात!! पण किती??

    वृत्तसंस्था

    मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर 24 तास उलटले आणि महाराष्ट्रातील ठाकरे पवार सरकारने पेट्रोल – डिझेलची काही अंशी दर कपात केली आहे. After 24 hours, after Center: Petrol-diesel price reduction in Maharashtra too
    पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली आहे.



    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारवरही दडपण होते, त्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक 2500 कोटींचा बोजा पडणार आहे.

    नोव्हेंबर 2021 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी घट केली होती, तेव्हा मात्र महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान आदी राज्य सरकारांनी पेट्रोल डिझेल वरील मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट कमी केला नव्हता. आता मात्र महाराष्ट्राने कालची केंद्र सरकारची दर कपातीची घोषणा झाल्यानंतर 24 तासांनी पेट्रोल डिझेलच्या दरात अंशतः कपात केली आहे.

    After 24 hours, after Center: Petrol-diesel price reduction in Maharashtra too

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य