विशेष प्रतिनिधी
हिंगोली : मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन तूर व इतर पिके धोक्यात आले होते त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.After 20 days of rest Rain in Hingoli district
परंतु काल रात्री हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव,अजेगांव आडोळ व इतर काही भागात चांगला पाऊस कोसळल्याने पिकांना पुन्हा एकदा जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे व तसेच आजही हिंगोली जिल्ह्यावर ढगाळ वातावरणाचे सावट असल्याचे दिसून येत आहे
पावसाच्या उघडापी मुळे सोयाबीन तूर व इतर पिके सुकत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता परंतु सध्या काही भागात पाऊस कोसळल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे मात्र अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे
- २० दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यात पाऊस
- सोयाबीन, तूर व इतर/पिकांना जीवदान
- शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे
- सेनगांव,अजेगांव आडोळ व भागात चांगला पाऊस
- अजूनही काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत