• Download App
    बारामतीत अजितदादांच्या सहयोग सोसायटीच्या गेटवर अफराज सादिक अत्तारची तरुणीला मारहाण करून लग्नासाठी जबरदस्ती|Afraj Sadiq Attar assaulted a young woman at the gate of Ajitdad's collaboration society in Baramati

    बारामतीत अजितदादांच्या सहयोग सोसायटीच्या गेटवर अफराज सादिक अत्तारची तरुणीला मारहाण करून लग्नासाठी जबरदस्ती

    प्रतिनिधी

    बारामती : बारामतीतील अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या गेटवर एकतर्फी प्रेमातून लव्ह जिहाद मधून तरुणीला मारहाण मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. बारामती शहरातील सहयोग सोसायटी येथे तरुणी मेहंदी काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी अरफाज सादिक अत्तार याने तरुणीचा विनयभंग केला आहे. तसेच तिला फरफटत घराबाहेर नेऊन तिला जखमी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.Afraj Sadiq Attar assaulted a young woman at the gate of Ajitdad’s collaboration society in Baramati



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सहयोग सोसायटी येथे मेहंदी काढण्यासाठी गेली होती. ज्या घरात मेहंदी काढण्यासाठी गेली होती त्या घरात जाऊन आरोपीने फिर्यादीस बाहेर बोलून घेतले. त्यानंतर तू माझ्याबरोबर चल असे म्हणून तिचा डावा हात ओढून पकडून फरफटत ओढत बंगल्याच्या गेटच्या बाहेर नेऊन माझ्याशी लग्न कर असे सांगितले. त्यानंतर तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या गालावरून हात फिरवून तू मला आवडते आरोपी म्हणाला. आरोपीने पीडितेचा विनयभंग करून तिला ढकलून खाली पाडून तिचे गुडघ्यास जखम करून तिला शिवीगाळ दमदाटी केली.

    बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. ज्या सहयोग सोसायटी मध्ये तरुणीला जखम झाली आहे त्या सोसायटीत अजित पवारांचे घर आहे. बारामती शहर पोलिसांनी भा.द.वि.  354, 354D, 323, 363, 504, 506 गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास बारामती पोलिस करत आहे.

    Afraj Sadiq Attar assaulted a young woman at the gate of Ajitdad’s collaboration society in Baramati

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस