विशेष प्रतिनिधी
मुंबई : चाहत्यांनीच टीका करत ट्रोल केल्याने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कमला पान मसाल्याची जाहिरात अखेर सोडली आहे.या कंपनीचे पैसेही परत करणार असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet
कमला पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन ट्रोल होत होते. त्यामुळे अखेर त्यांनी जाहिरात सोडली आहे. वाढदिवसाच्या बच्चन यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन कमला पान मसालाच्या जाहिरातीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. पान मसाल्याची जाहिरात करत असल्याच्या मुद्द्यावरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी बच्चन यांनी व्यावसायिक कारण दिले होते.काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका चाहत्याने पान मसाल्याच्या जाहिरातीवरून प्रश्न केला होता.
त्यावेळी त्याला उत्तर देताना बच्चन म्हणाले होते की, ‘जर कुठल्या संस्थेला फायदा होत असेल, तर आपण असा विचार करता कामा नये की आपण हे काय करत आहोत. जशी आमची इंडस्ट्री चालते, तशीच त्यांचीही इंडस्ट्री चालते. तुम्हाला असं वाटतं की मी हे करु नये, पण मला यासाठी फी दिली जाते.
मात्र पान मसालाच्या जाहिरातीमुळे लोक सातत्याने टीका आणि ट्रोल करू लागल्याने अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीतून माघार घेतली आहे. अमिताभ बच्चन यांनी जाहिरातीतून आपलं नाव मागे घेतलं आहे. त्याचबरोबर कंपनीने जाहिरातीसाठी दिलेली आगावू रक्कमही ते कंपनीला परत करणार आहेत.
Afghan pop star Arya has accused the Taliban of being Pakistan’s puppet
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू