Friday, 2 May 2025
  • Download App
    गहाळ वस्तू अथवा कागदपत्रांच्या प्रमाणपत्रासाठी आता शपथपत्राची गरज नाही; पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचा आदेश|Affidavits are no longer required for certification of missing items or documents; Order of Commissioner of Police Hemant Nagarale

    गहाळ वस्तू अथवा कागदपत्रांच्या प्रमाणपत्रासाठी आता शपथपत्राची गरज नाही; पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांचा आदेश

    वृत्तसंस्था

    मुंबई : गहाळ झालेल्या वस्तू अथवा कागदपत्रांबाबत तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आता कोणतेही शपथपत्र सादर करण्याची गरज नाही. या संदर्भातील आदेश बृहनमुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढला आहे. असे शपथपत्र मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी एक आदेश काढून दिला आहे.Affidavits are no longer required for certification of missing items or documents; Order of Commissioner of Police Hemant Nagarale

    पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे की, गहाळ झालेल्या वस्तू अथवा पारपत्र, चेकबुक, परवाना अशी कागदपत्र गहाळ झाली असल्याची तक्रार देण्यासाठी अनेकजण पोलिस ठाण्यात येतात. तेव्हा याबाबतचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे तक्रारीबरोबर संबंधित गोष्टी गहाळ झाल्याचे नोटरीकडून प्रमाणित असलेले शपथपत्र मागितले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.



    या मुद्यावरून अनेकदा तक्रारदाराची अडवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक परिपत्रक काढून तक्रारीसोबत असे कोणतेही शपथपत्र जोडण्याची गरज नाही. तशी तरतूद कायद्यात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वस्तू, कागदपत्रे गहाळ झाल्याची तक्रार शपथपत्र न घेता दाखल करून घ्यावी. शपथपत्र घेणे बेकायदा आणि आक्षेपार्ह आहे.

    तक्रारीनंतर वस्तू, कागदपत्र हे गहाळ झाल्याचे प्रमाणपत्र तक्रारदाराला द्यावे. या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. या आदेशाच्या प्रती त्यांनी विविध पोलिस ठाण्यांकडे अंमलबजावणीसाठी पाठविल्या आहेत.

    Affidavits are no longer required for certification of missing items or documents; Order of Commissioner of Police Hemant Nagarale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??