• Download App
    जाहिरात शिवसेनेची, सर्वेक्षणात बहुमत शिवसेना-भाजपला, पण कथित मतभेदाच्या आनंदाच्या उकळ्या राष्ट्रवादीला!!Advertisement of Shiv Sena, Shiv Sena-BJP majority in the survey

    जाहिरात शिवसेनेची, सर्वेक्षणात बहुमत शिवसेना-भाजपला, पण कथित मतभेदाच्या आनंदाच्या उकळ्या राष्ट्रवादीला!!

    प्रतिनिधी

    मुंबई : जाहिरात शिवसेनेची, सर्वेक्षणात बहुमत शिवसेना-भाजप युतीला, पण जाहिरातीवरून शिवसेना-भाजपमध्ये कथित मतभेद असल्याच्या आनंदाच्या उकळ्या राष्ट्रवादीला फुटल्या आहेत. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. Advertisement of Shiv Sena, Shiv Sena-BJP majority in the survey

    महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर शिवसेना-भाजप युतीला 165 ते 185 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळेल असे झी न्यूजच्या सर्वेक्षणात नमूद केले आहे. त्यावरून शिवसेनेने आज सर्व वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवर जाहिरात दिल्या. राष्ट्रात मोदी, महाराष्ट्र शिंदे असे या जाहिरातीत म्हटले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा तीन टक्के मते जास्त मिळाली. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपची खेचली आहे.

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपने एकनाथ शिंदेंकडेच नेतृत्व द्यावे असा खोचक सल्ला दिला, तर भाजपच्या 105 आमदारांमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर शिवसेनेच्या 40 आमदारांमुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, असा टोला अजित पवारांनी लगावला.

    शिवसेना आणि भाजप युतीला 46% मते सर्वेक्षणातून मिळाली आहेत. त्या उलट संपूर्ण महाविकास आघाडीला 35 टक्क्यांच्या आत मते मिळून फक्त 118 जागा मिळण्याची शक्यता दाखविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 11 % मते मिळाली, असे दाखविले आहे. अशा स्थितीतही राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेना – भाजप मधल्या कथित मतभेदांच्या आनंदाचा उकळ्या फुटल्या आहेत. स्वतःच्या पक्षाला फक्त 11 % मिळत आहेत, याकडे राष्ट्रवादीचे नेते सोयीस्कर काणाडोळा करत आहेत.

    Advertisement of Shiv Sena, Shiv Sena-BJP majority in the survey

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस