विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026: खासदार औद्योगिक महोत्सव’ अंतर्गत आयोजित ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उदघाटन केले. यावेळी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF) चे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, 22 हून अधिक देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच राजनयिक उपस्थित होते.Advantage Vidarbha 2026 International Business Conclave inaugurated; Ambassadors, Consuls from 22 countries present
विदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवरून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूक वाढावी विदर्भाचा विकासाचा अनुशेष दूर करून इथल्या संसाधनांच्या वापरासह विदर्भातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या हेतूने राज्यातल्या फडणवीस सरकारने पुढाकार घेतला आहे. या पुढाकारातूनच ॲडव्हांटेज विदर्भ हा उपक्रम सध्या सुरू आहे. या उपक्रमात 22 पेक्षा अधिक देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच अन्य राजनैतिक अधिकारी उपस्थित राहिल्याने या उपक्रमाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
– ऑटोमोबाईल उद्योगाचे नवे केंद्र : नागपूर
महिंद्रा अँड महिंद्राची नागपूरमध्ये होणारी ₹15,000 कोटींची भरीव गुंतवणूक केवळ एक प्रकल्प नाही, तर विदर्भाच्या औद्योगिकीकरणाचा नवा अध्याय आहे. कार आणि ट्रॅक्टर उत्पादनासाठीचा देशातील सर्वात मोठा एकात्मिक प्रकल्प येथे उभा राहत असून, नागपूरचे पहिले आणि सर्वात मोठे, भविष्यासाठी सज्ज असे मोबिलिटी हब आकार घेत आहे.
नेक्स्ट जनरेशन ईव्ही, आयसीई प्रवासी व व्यावसायिक वाहने तसेच अत्याधुनिक ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी सज्ज असलेला हा प्रकल्प दरवर्षी 5 लाखांहून अधिक वाहने आणि 1 लाख ट्रॅक्टर उत्पादनाची क्षमता धारण करेल. मजबूत सप्लायर इकोसिस्टिममुळे उद्योगांना चालना मिळेल आणि विदर्भासह राज्यभरात लाखो युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
Advantage Vidarbha 2026 International Business Conclave inaugurated; Ambassadors, Consuls from 22 countries present
महत्वाच्या बातम्या
- औद्योगिक क्षेत्रात विदर्भाची घोडदौड; ॲडव्हांटेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन
- रशियाने म्हटले- भारत इतर देशांकडून तेल खरेदीस मुक्त; यात काही चुकीचे नाही, पण रशियन तेल खरेदी थांबवल्याची माहिती नाही
- Actor Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवने केले सरेंडर; चेक बाउंस प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आत्मसमर्पण
- वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करायचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय; शुभेच्छांचे होर्डिंग्ज आणि पुष्पगुच्छ पण नकोत!!