• Download App
    महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी हरलेत, तर महापालिका, झेडपी निवडणुकांमध्ये काय होईल?? Advantage Hindutva : maharashtra grampanchayat elections uprooted political base of Congress - NCP and consolidated Shivsena - BJP, municipal elections will do the same

    महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी हरलेत, तर महापालिका, झेडपी निवडणुकांमध्ये काय होईल??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात 20 डिसेंबर 2022 रोजी लागलेला ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल महाराष्ट्राचे बरेचसे राजकीय चित्र स्पष्ट करणारा ठरला आहे. किंबहुना ग्रामीण सह शहरी आणि निमशहरी राजकारणाचा आरसाच तब्बल 7000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाने दाखविला आहे. या निवडणुकांमध्ये 74 % मतदान झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मतदारांचे ठळक प्रतिबिंब मतदानात पडले होते. अर्थातच त्या प्रतिबिंबाचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीतून दिसला आहे. Advantage Hindutva : maharashtra grampanchayat elections uprooted political base of Congress – NCP and consolidated Shivsena – BJP, municipal elections will do the same

    ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या आकडेवारीकडे नजर टाकली, तर भाजप आणि दोन्ही शिवसेना यांनी ग्रामीण राजकारण व्यापून टाकले आहे, ते इतके की जवळजवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या दुप्पट यश भाजप आणि दोन्ही शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षांना मिळाले आहे. भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट या हिंदुत्ववादी पक्षांची एकत्रित बेरीज केली तर 7000 पैकी 3827 जागा हिंदुत्ववादी पक्षांना मिळाल्या आहेत, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 2096 जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ तब्बल 850 जागा हिंदुत्ववादी पक्षांना जास्त मिळाल्या आहेत. याचा अर्थच ग्रामीण भागातून काँग्रेस – राष्ट्रवादी सारख्या तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि एकेकाळी ग्रामीण भागावर वर्चस्व असलेल्या पक्षांचा राजकीय पाया या भागातून उखडत चालला आहे, तर हिंदुत्ववादी पक्ष ग्रामीण भागावरील आपली राजकीय पकड मजबूत करताना दिसत आहेत.

    बाळासाहेब, मुंडे आणि महाजन

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या हिंदुत्ववादी राजकारणाच्या रोपट्याचे आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मोठ्या हिंदुत्ववादी राजकीय वृक्षात रूपांतर झाले आहे. शिंदे, फडणवीस आणि ठाकरे या वृक्षाचे आणखी सिंचन करत आहेत.



    आता जर ग्रामीण भागातूनच काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मजबूत असलेले राजकीय पाये खिळखिळे होत असतील किंबहुना उखडले असतील तर ज्या शहरी भागातून 1990 च्या दशकातच या दोन्ही पक्षांचे राजकीय पाये उखडले गेलेत, तिथे महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यासारख्या पक्षांची अवस्था काय होईल??, हे सांगायला फार मोठ्या राजकीय ज्योतिषाची गरज नाही.

    निकालांची चुणूक

    7000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीला बसलेला पराभवाचा धक्का, शहरी भागात या दोन्ही पक्षांना आणखी किती मोठा धक्का देऊ शकेल, याचीच चुणूक आहे. किंबहुना शहरी भागात या दोन्ही पक्षांचे उरलेसुरले ही नामोनिशाण टिकू शकेल की नाही ही शंका उत्पन्न व्हावी, असे ग्रामपंचायतींचे निकाल लागले आहेत.

    फेब्रुवारी 2023 पर्यंत महाराष्ट्रातील 16 महापालिकांच्या आणि 34 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांचा कल पाहिला तर हिंदुत्ववादी पक्षांसाठी मोठ्या यशाची अपेक्षा त्या निकालांनी निर्माण केली आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धास्तीत भर घातली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, मीरा-भाईंदर, नाशिक, पुणे, नागपूर, संभाजीनगर आदी महापालिका परिक्षेत्रांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राजकीय तब्येत मूळातच तोळा मासा आहे. या शहरांमध्ये हिंदुत्ववादी पक्षांची पकड अतिशय मजबूत आहे.

    या महापालिकांमध्ये राजकीय शिरकाव करण्यासाठी दोन्ही काँग्रेस धडपडत असताना त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीतच मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीत जिथे आपला राजकीय पायाच भुसभुशीत आहे किंबहुना आधीच उखडला गेला आहे, त्या वर उल्लेख केलेल्या शहरी महापालिका निवडणुकीत ते असा कोणता राजकीय दिवा लावणार आहेत??, हा खरा प्रश्नच आहे. पण जे महापालिकांच्या निवडणुकीत होणार आहे तेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत झाले, तर आश्चर्य वाटायला नको.

    – महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज हिंदुत्ववादी

    एकूणच महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी राजकारणाचा बाज आता हिंदुत्ववादी झाला आहे. मग तो महाराष्ट्रातल्या लिबरल विचारवंतांना मान्य असो अथवा नसो, महाराष्ट्राचे राजकारण काँग्रेसी संस्कृती कडून हिंदुत्ववादी संस्कृतीकडे आले आहे. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी पक्षांचे राजकीय मजबुतीकरण झाले आहे. त्यामुळे अर्थातच ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकीय पाये आणखी उखडले गेल्यास आश्चर्य वाटायला नको, नेमका हाच या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांचा राजकीय सांगावा आहे

    Advantage Hindutva : maharashtra grampanchayat elections uprooted political base of Congress – NCP and consolidated Shivsena – BJP, municipal elections will do the same

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!