• Download App
    छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात उद्या मराठा क्रांती मूक आंदोलन, अॅड. प्रकाश आंबेडकरही होणार सहभागी । adv Prakash Ambedkar participating In Maratha reservation agitation in kolhapur with MP sambhajiraje chhatrapati

    छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात उद्या मराठा क्रांती मूक आंदोलन, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरही होणार सहभागी

    Maratha reservation agitation in kolhapur : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. adv Prakash Ambedkar participating In Maratha reservation agitation in kolhapur with MP sambhajiraje chhatrapati


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ ज्येष्ठ नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.

    छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे, त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.

    ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय दिला. देशात सर्वात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. बाबासाहेबांना सर्वार्थाने मदत केली ती शाहू महाराजांनी. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा गौरव केला आहे. अनेक अर्थांनी हा पाठिंबा अभूतपूर्व असणार आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात हा सामाजिक समतेचा आणि एकोप्याचा संदेश जाईल, अशा भावना वंचित बहुजन आघाडीतर्फे व्यक्त करण्यात आल्या आहेत.

    adv Prakash Ambedkar participating In Maratha reservation agitation in kolhapur with MP sambhajiraje chhatrapati

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार