प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नेमके चालले काय आहे?, ते कळेनासे झाले आहे. कारण त्यांनी राजकारणात माझी गल्ली – तुझी गल्ली असा खेळ चालू केला आहे. किंबहुना ते आव्हानांची नवी पेरणी करायला लागले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाहीत, हा भाग अलहिदा. aditya thackeray changes every political ground to challange cm eknath shinde , but he ignores its as juvinile act
पण आधी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध उद्योग राज्यामधून निघून गेल्याचा दावा करून जाहीर चर्चेचे आव्हान दिले. त्या आव्हानाची खल्ली उडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला निघून गेले. तेथून १.७५ लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे करार करून आले.
त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वरळीतून निवडणूक लढवून निवडून येण्याचे आव्हान दिले. ते आव्हान पूर्ण होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, तोच आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना तिसरे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हणे वरळीतून नव्हे, तर ठाण्यातून निवडून येऊन दाखवावे, असे हे आव्हान आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री आपले कोणतेच आव्हान स्वीकारत नसल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्यना अर्थ समजतो का
याचा नेमका अर्थ काय होतो, हे आदित्य ठाकरे यांच्या लक्षात तरी येते आहे का मुख्यमंत्री सरळ सरळ आदित्य ठाकरे यांच्या लहान वयाकडे पाहून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दाखवत आहेत. कारण आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना वरळीतून निवडून येण्याचे आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाने वरळीत कोळी बांधवांच्या हस्ते मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा घाट घालून ते आव्हान परतवून लावण्याच्या शक्तिप्रदर्शनाची तयारी चालवली. हे शक्तिप्रदर्शन आपल्यालाच राजकीयदृष्ट्या महागात पडेल हे पाहताच आदित्य यांनी पवित्रा बदलून मुख्यमंत्र्यांना ठाण्यातून निवडणूक लढवून जिंकण्याचे आव्हान दिले आहे.
आदित्यच अडकले खेळात
पण या सर्वांमधून आदित्य ठाकरे यांचे खरे राजकीय आव्हान मुख्यमंत्री स्वीकारण्याचे सोडाच ते गांभीर्यानेही घेत नसल्याचे दाखवून देत आदित्य ठाकरे यांच्या आव्हानतली हवा परस्पर काढून घेताना दिसत आहेत. तर आदित्य ठाकरे हे त्यांच्या न कळत माझी गल्ली की तुझी गल्ली या राजकीय खेळात अडकले आहेत.
aditya thackeray changes every political ground to challange cm eknath shinde , but he ignores its as juvinile act
महत्वाच्या बातम्या