• Download App
    Adam Master नामुष्कीकारक पराभव जिव्हारी, आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्ती

    Adam Master नामुष्कीकारक पराभव जिव्हारी, आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्ती

    विशेष प्रतिनिधी

     सोलापूर : वयाच्या 80 व्या वर्षी झालेला पराभव जिव्हारी लागून सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे . सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कामगारांसाठी लाल झेंड्याच्याखाली सामाजिक चळवळीत काम करत राहणार असल्याचं स्पष्ट केले. Adam Master’s retirement from politics

    दरम्यान सोलापूर शहर मध्य मध्ये फेर निवडणूक घ्यावी यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    सोलापुरात असंघटित कामगारांचा जगातील सर्वात मोठा गृह प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पासाठी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी रात्रीचा दिवस केला होता. माकप अन् भाजप या 2 पक्षांची विचारधारा म्हणजे 2 ध्रुवांची 2 टोके. पण कष्टकऱ्यांसाठी हे 2 ध्रुव एकत्र आले होते. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकल्पाला कथितपणे विरोध केला. पण आडम मास्तरांनी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मदतीने या प्रकल्पाला मंजुरी मिळवली आणि तत्कालीन मुख्यंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊन दाखवला.

    सोलापुरातील असंघटित कामगारांची दैना असते. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. पण आडम मास्तरांनी या गरिबांना पक्क्या घराचे स्वप्न दाखवले. त्यासाठी ते रात्रंदिवस झटले. त्यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले. त्यांचे लोकार्पणही त्यांच्याच हस्ते केले.

    कामगारांसाठी दिवसातील 12 ते 14 तास काम करणारे व स्वतःच्या घराचा दरवाजा कुणासाठीही उघडे ठेवणारे नेते म्हणून माकप नेते नरसय्या आडम यांची ओळख आहे. ते कामगारांचे लढे रस्त्यांवर तर लढलेच, शिवाय त्यांनी न्यायालयातही त्यांची ठाम साथ दिली. गत 60 वर्षांपासून ते महाराष्ट्रातील कामगार चळवळीशी संलग्नित आहेत. असंघटित कामगारांसाठी जिवाचे रान करणारा नेता म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते. विधानसभेत विरोधाची खिंडी एकतर्फी लढवणारी, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आग ओकणारी बुलंद तोफ म्हणूनही ते ओळखले जातात.

    आणीबाणीनंतर 1978 च्या निवडणुकीत आडम मास्तर माकपच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचलेत. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत खडतर आहे. दहावी पास झाल्यानंतर ते तंबू थिएटरमधील चित्रपटांचे पोस्टर भितींवर चिकटवत होते. ते सोलापुरात भटकायचे. त्यांचे वडील कॉम्रेड नारायणराव आडम यांनी त्यांना विणकरांच्या मुलांच्या शिकवण्या घेण्यास सांगितले. ते तेव्हा मास्तर झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांना अवघा महाराष्ट्र आडम मास्तर म्हणून ओळखतो.

    सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण त्या स्थितीत आडम मास्तर 3 वेळा विधानसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

    Adam Master’s retirement from politics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला