प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिलाने सोशल मीडियावर ट्विटद्वारे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. उर्मिला मातोंडकरने ट्विट करून लिहिले की, “मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. मी आता होम क्वारंटाईनमध्ये स्वतःला आयसोलेटेड केले आहे.
माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी विनंती करते की, त्यांनी ताबडतोब स्वतःची चाचणी करावी. दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.Actress Urmila Matondkar Corona Positive appeals to Test everyone in Her Contact by tweeting
उर्मिला मातोंडकरने हे ट्विट करताच तिचे चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
ऊर्मिला मातोंडकर यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुशीचे कारण देत काही दिवसांनीच काँग्रेस पक्षाचा राजीनामाही दिला. यानंतर काही दिवसांनी त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. ऊर्मिला मातोंडकर सोशल मीडियावरही सक्रिय आहेत.
Actress Urmila Matondkar Corona Positive appeals to Test everyone in Her Contact by tweeting
महत्त्वाच्या बातम्या
- पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास
- कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल
- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये
- काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द