विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ कला दिग्दर्शक आणि चित्रपट सृष्टीचे विश्वकर्मा म्हणून ओळखले जाणारे मराठी सह बॉलीवूडमध्येही अनेक भव्य दिव्य कलाकृती उभारणारे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल ND स्टुडिओ मधली आपल्या आवडत्या सेट वर गळफास लावून आत्महत्या केली. Actress Sonali Kulkarni emotional post after Nitin Desais suicide.
त्यांच्या आत्महत्ये नंतर राजकारण,समाजकारण, कलाक्षेत्र हे पूर्त हादरून गेलं. कला विश्वात त्यांचे अनेक जवळचे मित्र आहेत . मात्र यापैकी कोणालाच या गोष्टीची साधी कुणकुणही नव्हती याची खंत सोशल मीडियातून काल दिवसभर व्यक्त होत होती. लगान,जोधा अकबर, मुन्नाभाई एमबीबीएस यासारख्या अनेक चित्रपटांचे सेट हे फक्त नितीन देसाई यांनी केले आहे. तर मराठीमध्ये बालगंधर्व या सिनेमाचा सेट देखील त्यांनी केला आहे. भव्य दिव्य आणि काहीतरी खास हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आजवरचा त्यांच्या कामाचा आवाका पाहता त्यांचं या क्षेत्रातलं कार्य मोठ आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून नितीन देसाई यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं होतं . आणि यातूनच त्यांनी हा निर्णय घेतला असं सध्या तरी बोललं जातंय. मात्र त्यांच्या जाण्याने अवघ मनोरंजन विश्व ढवळून निघालयं संवेदनशील अभिनेत्री म्हूणन ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी हिने देसाई यांच्या आत्महत्या नंतर भावुक पोस्ट समाज माध्यमातून शेअर केली आहे. यात सोनाली लिहिते नितीन..किती काम केलं आपण एकत्र.. तुझ्या पहिल्या मोठ्या कारमध्ये तू आम्हाला चक्कर मारून आणली होतीस.. तुझ्या स्टुडिओतला तुझा पहिला इंटरव्हयू मी घेतला होता..
आपल्याला नॅशनल अवॅार्ड एकत्र मिळालं होतं..
किती आठवणी…..!!!
आत्ता आत्तापर्यंतच्या..
पण तुझ्या आत काय कोलाहल चालू होता कळलंच नाही कधी..
वाटलं फक्त तुझ्या कल्पक, भव्य आयडिया आणि स्वप्नं असतात तिथे..
ND Studios हा सर्वार्थानं लॅण्डमार्क आहे सगळ्यांसाठी..
हे काय करून बसलास मित्रा..
हे काय करून बसलास..
Actress Sonali Kulkarni emotional post after Nitin Desais suicide.
महत्वाच्या बातम्या
- पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही
- देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त
- हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार
- विरोधकांच्या’I.N.D.I.A’ची आज पहिली अग्निपरीक्षा; दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार