विशेष प्रतिनिधि
पुणे : आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेची मालिकेमुळे लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. रुपालीने आजवर अनेक मालिका, नाटकांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. इतकंच नव्हे तर रुपाली बिग बॉस मराठी २ मध्येही सहभागी होती. विविध क्षेत्रात स्वतःची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या रुपालीने तिच्या आजवरच्या अभिनय कारकीर्दीत सिनेमांमध्ये मात्र काम केलं नाही. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या Actress Rupali Bhosale news
रुपालीने सोशल मिडीयावर एक पोस्ट केलीय. यात तिने आनंद व्यक्त केलाय. कारण सुद्धा तसंच खास आहे. रुपालीला तिच्या विनाकारण राजकारण या सिनेमासाठी पुरस्कार मिळाला. याविषयी रुपाली पोस्ट करुन लिहीते, “Larger than life. सिनेमाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सिनेमा हे larger than life असतं. आणि ते अगदी खरं आहे, सिनेमा थिएटर मध्ये गेल्यानंतर ते आपल्या सगळ्यांना जाणवतं, भव्य दिव्य थेटर, अगदी छान, आरामदायी आसन व्यवस्था,air-conditioning,आणि खूप मोठा पडदा, ज्याच्यावर आपल्याला सिनेमा दिसतो, मोठ मोठ्या speakers मधनं आपल्याला sound आणि music ऐकायला मिळतं.”रुपाली पुढे लिहीते, “तीन तासांमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो,तसा अनुभव आपल्याला टेलिव्हिजनवर कधी मिळणार नाही,
कारण टेलिव्हिजनचा पडदा छोटा असतो, आजपर्यंत मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही सिनेमे का नही करत, किंवा तुम्ही आजपर्यंत सिनेमे का नाही केले, पण असं नाहीये की मला सिनेमा करायचा नव्हता, माझ्या वाटेला सिनेमे आलेच नाहीत, आले ते पण खूप मोजके आले, मला खरंच आवडलं असतं सिनेमा करायला आणि मला अजूनही सिनेमे करायची खूप इच्छा आहे, जे मोजके सिनेमे मी केले त्यातला हा “विनाकारण राजकारण” हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, आणि त्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला हे Award ही मिळालं.”
रुपाली शेवटी लिहीते, “माझ्यासाठी हा आनंद खूप मोठा आहे, कारण हे सिनेमाचं Award आहे,ज्यावेळेला मी या क्षेत्रात यायचं ठरवलं, या क्षेत्रातला येण्याचा मार्ग अगदी थेटर मध्ये अंधारात जेव्हा आपण आपली seat शोधत असतो आपण चाचपडतो थोडं धडपडतो आणि मग शेवटी आपल्याला आपली सीट मिळते,तसंच मी जेव्हा या क्षेत्रात आले त्यावेळेला चाचपडत नाटक क्षेत्रात प्रवेश केला आणि तिथे मला माझी शीट मिळाली, मग सिरीयलच्या मार्गात चाचपडले आणि तीही माझी सीट आज मला मिळाली आहे,
कदाचित हे जे सिनेमाचं अवॉर्ड मला मिळालं आहे ते कदाचित एक संकेत असू शकतं ….””विनाकारण राजकारण” च्या पूर्ण टीमचे आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल या टीमचे मी खूप खूप आभार मानते…”रुपालीची ही पोस्ट पाहून अनेकांनी तिचं कमेंटमध्ये अभिनंदन केलंय. रुपाली सध्या आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भूमिका साकारतेय.
Actress Rupali Bhosale news
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांचे आणखी एक नॅरेटिव्ह फडणवीसांकडून उद्ध्वस्त; राष्ट्रपती शासन उठविण्यात नव्हे; लावण्यातच पवारांचा हात!!
- VIDEO : ‘स्वदेस’फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात!
- शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धव शिवसेना वळणावर; पक्षपाताचा आरोप केला निवडणूक आयोगावर!!
- बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी