विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राचा 100 कोटीच्या क्लब मध्ये समाविष्ट होणारा पहिला सिनेमा सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोघांनी चित्रपट विश्वात अ पदार्पण केलं आणि त्यानंतर ही दोघं कायमच चर्चेत राहिली. Actress Rinku Rajguru first experience of watching a drama.
रिंकू राजगुरु चीं सैराट नंतर अवघ्या महाराष्ट्रा क्रेझ बघायला मिळाली. सैराट नंतर रिंकू ने अनेक चित्रपटात काम केलं आणि ते चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीचे उतरले. रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते .
तिच्या आगामी सिनेमाबद्दल तिच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल तिच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असते. तिने आयुष्यात पाहिलेल्या पहिल्या नाटकाचा अनुभव सांगितला आहे.
रिंकुने पाहिलेलं पहिलं नाटकरिंकु राजगुरुने सोशल मिडीयावर एक नवीन पोस्ट शेअर केलीय. रिंकुने प्राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित संगीत देवबाभळी नाटक पाहिलं. रिंकुने हे नाटक पाहिल्यावर सोशल मिडीयावर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करुन रिंकु लिहीते.. माझ्या आयुष्यातील मी पाहिलेलं पहिलंच नाटक.
अप्रतिम अनुभूती. सगळ्याच अंगाने सर्वांगसुंदर असं नाटक आहे ‘देवबाभळी’. प्राजक्त आणि सगळ्या टीमला खूप शुभेच्छा आणि मनापासून अभिनंदन !रिंकु राजगुरुचं वर्क फ्रंटरिंकु राजगुरु आता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Actress Rinku Rajguru first experience of watching a drama.
महत्वाच्या बातम्या
- Uttarakhand Landslide : गौरीकुंडमध्ये भूस्खलन ढिगाऱ्याखाली चार मृतदेह आढळले, १५ बेपत्तांचा शोध सुरू
- ड्रॅगनला दणका, केंद्र सरकारची लॅपटॉप-टॅब्लेट-पीसी आयातीवर बंदी; मेक इन इंडिया उत्पादनाला चालना मिळणार
- १७ वर्षीय डी.गुकेश बनला भारताचा अव्वल बुद्धिबळपटू! ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला टाकले पिछाडीवर
- साताराची कन्या अपूर्वा अलाटकर ठरली पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला लोकोपायलट!