विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी रंगभूमी नाटक सिरीयल आणि बालनाट्याच्या विश्वात आपला ठसा उमटवणारी . अभिनेत्री राधिका देशपांडे हिने द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक या कार्यक्रमात नुकतीची हजेरी लावली होती.. या मुलाखतीत राधिका ने तिचा आजवरचा प्रवास उघडला. Marathi actress Radhika Deshpande interview on the focus India
झी मराठीवरील होणार सुन मी या घरची या मालिकेत नायीकेचीं मैत्रीण म्हणून दिसलेली आणि स्टार प्रवाह वाहिनी वरील आई कुठे काय करते? या सध्या सुरु असलेल्या मालिकेत ही राधिका नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे.
राधिकाचं मोठं काम हे बालरंगभूमीसाठी सुरू आहे .. सध्या तिचे दोन बालनाट्य चांगलेच गाजत आहेत ” मुंगळे चार “आणि “सियावर रामचंद्र की जय” या दोन बालनाट्याची निर्मिती, लेखन, आणि दिग्दर्शन राधिकांनी केलंय.
सियावर रामचंद्र की जय. या दोन तासाच्या दीर्घांकात एकूण 75 कलाकार असून.. महाराष्ट्रभर या बालनाट्याचे सध्या प्रयोग सुरू आहेत.
गेल्या महिन्यात राधिकाची चार कागद,दोन सह्या, आणि एक शिक्का..ही पोस्ट सोशल मीडियावर गाजली.
या पोस्टमध्ये तिने सरकारी कामांमध्ये होत असलेली दिरंगाई त्यामुळे कलाकारांना सोसावं लागणारा मनस्ताप व्यक्त केला होता.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत, तिने ती पोस्ट लिहिली.. आणि अवघ्या काही तासातच सूत्र हल्ली. हा सगळा सविस्तर अनुभव राधिकाने गप्पाष्टक या कार्यक्रमात शेअर केला आहे.
राधिका ने आतापर्यंत बालनाट्य विषयक आठ पुस्तक, काही एकांकिका लिहिल्या आहेत .. राधिकांनी आजवर अनेक बालनाट्य शिबिर घेतली आहेत.. राधिका क्रिएशन या नावाने ती या क्षेत्रात काम करतीय. आणि रंगभूमीसाठी भावी शिलेदार तयार करतीये .. राधिका सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहं त्यांच्या संपर्कात असते .
राधिकाची संपूर्ण मुलाखत आपण द फोकस इंडिया च्या यूट्यूब चॅनल वर लवकरच बघू शकतो.
actress Radhika Deshpande interview on the focus India
महत्वाच्या बातम्या
- Religious Conversion : ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराचा सापळा रचणाऱ्या शाहनवाजला मुंबईतून अटक
- पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नितीश कुमार बाहेर, तर मग उरलेत किती??
- न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस
- आळंदीत लाठीमार झालेला नाही, देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट खुलासा