विशेष प्रतिनिधी
पुणे : अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे मराठी मनोरंजन विश्वातील आणि खऱ्या आयुष्यातील देखील लोकप्रिय जोडी. या जोडीला एकत्र कामं करताना पाहणं हे त्यांच्या च्याहत्यासाठी एक पर्वणी असते. या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायलाही आवडते. Actress Priya Bapat And Actor Umesh Kamath New Drama Story.
हीच सुंदर केमिस्ट्री नाट्यरसिकांना आता नाट्यगृहात तब्बल दहा वर्षांनी पाहायला मिळणार आहे.सोनल प्रॅाडक्शन्स निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे.
दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत यांच्यासह पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत तर नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत.
द सिटी ऑफ ड्रीम या वेब सिरीज सारख्या हिंदी शो मधून हिंदीमध्ये आपली नवीन ओळख निर्माण करत असतानाच क्रियावा पटीने नाटकाच्या माध्यमातून निर्मितीच्या क्षेत्रात आता पाऊल टाकलं आहे.
तर तर उमेशही विविध माध्यमातून चाहत्यांना भेटायला येत असतो. या जोड गोळीचा करिअर आलेख पाहता तो अधिक उंचावत आहे.अखेर १० वर्षानंतर रसिकांची ही इच्छा लवकरच पूर्ण झाली. कारण एका दशकानंतर हे क्युट कपल पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र झळकलंय. ‘जर तर ची गोष्ट’ नाटकाच्या माध्यमातून प्रिया आणि उमेशची हिट जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पारशुभारंभाच्या प्रयोगाविषयी निर्माते नंदू कदम म्हणतात, ‘’ॲानलाईन, ॲाफलाईन तिकीटविक्री सुरू झाल्यापासूनच नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. शुभारंभाचा प्रयोग दणक्यात पार पडल्यामुळे खूप आनंद आहे. मला खात्री आहे, हे नाटक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. तिकीट न मिळाल्याने काही प्रेक्षक नाराजही झाले आहेत, मात्र त्यांच्यासाठी आम्ही लवकरच आणखी प्रयोग सादर करू. सर्व वयोगटाला आवडेल, असे हे कौटुंबिक नाटक आहे.’’
Actress Priya Bapat And Actor Umesh Kamath New Drama Story.
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंकेचा महत्त्वाचा निर्णय, चिनी-पाकिस्तानी कंपन्यांकडून काढला LNG प्रकला, भारताला देणार
- आसाममध्ये बहुविवाहावर बंदी येणार, तज्ज्ञ समितीने सादर केला अहवाल ; मुख्यमंत्री हिमंता म्हणाले…
- ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जातीयवादी’, सुवेंदू अधिकारी यांचा मोठा आरोप, म्हणाले- बंगालमधून नूंहमध्ये पाठवले लोक
- ‘’अफजलखान, औरंगजेब याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना…’’ आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!