समाज माध्यमात फोटो शेअर करत दिली चाहत्यांना माहिती!
विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी मनोरंजन विश्वात यंदा लगीन काही सुरू झाली आहे. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी लग्न बंधनात अडकतायेत. मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, अमृता देशमुख-प्रसाद जवादे, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या लोकप्रिय जोड्यांनंतर आता लवकरच ‘दगडी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत विवाहबंधनात अडकणार आहे. इन्स्टाग्रामवर जोडीदाराबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत तिने साखरपुडा झाल्याची घोषणा केली. Actress Pooja Sawant news
अभिनेत्री पूजा सावंतने २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अल्पावधीतच पूजाने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. ‘दगडी चाळ’ चित्रपटामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. आता अभिनेत्रीने आयुष्यातील एक नवा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. “We are engaged…” असं म्हणत पूजाने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.
पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे परंतु, तो कोणताही अभिनेता नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीचा मालक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर सध्या मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पूजाची सख्खी बहीण रुचिरा सावंतने देखील लाडक्या ताईसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Actress Pooja Sawant news
महत्वाच्या बातम्या
- Nitish Kumar : नितीश कुमार सरकारने मुस्लीम सणांसाठी शाळांमधील सुट्टी वाढवली, तर हिंदू सणांसाठीची केली कमी!
- ”महात्मा गांधी हे महापुरुष होते, तर पंतप्रधान मोदी हे…” ; उपराष्ट्रपतींचं मोठं विधान!
- मल्लिकार्जुन खर्गे तेलंगणात भरसभेत भडकले अन् उपस्थितांना म्हणाले, ‘गेट आउट’
- ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक; प्रवासी थोडक्यात बचावले