• Download App
    ठाणे: व्हॅक्सिन के लिए कुछ भी करेगा ! लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर ; भाजपने काढले वाभाडे।Actress Meera Chopra get vaccinated on fake identity card

    ठाणे: व्हॅक्सिन के लिए कुछ भी करेगा ! लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर ; भाजपने काढले वाभाडे

    कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीचं लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना.


    संबंधित महिलेला फ्रंटलाईन वर्करचे ओळखपत्र कोणत्या संस्थेने दिले आणि कशासाठी दिले हे देखील तपासावे लागणार आहे. त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्थादेखील अडचणीत आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. 
    Actress Meera Chopra get vaccinated on fake identity card


     

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : ठाणे महापालिकेच्या पार्कींग प्लाझा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर म्हणून चक्क एक अभिनेत्री काम पाहत आहे .काय?वाचून धक्का बसला ना तर फ्रंटलाईन वर्कर असल्याचे भासवून चक्क एका प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्रीचं लसीकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित अभिनेत्रीकडे फ्रंटलाईन वर्करचं ओळखपत्र होतं. एकीकडे राज्यात लसींचा तुटवडा असल्यामुळे सरकारने १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठीचं लसीकरण बंद ठेवलं आहे. ४५ वर्षावरील लोकांना लस मिळावी यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहेत. परंतू ठाणे महानगरपालिकेशी संलग्न असलेल्या कोविड सेंटरचं ओळखपत्र तयार करत मीरा चोप्रा या अभिनेत्रीने कोरोनाची लस घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

    मीरा चोप्रा ही तामिळ, तेलगू सिनेसृष्टीत काम करते. मीरा चोप्राने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाजा येथील कोविड सेंटरमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत असल्याचं भासवत लस घेतली. महत्वाची गोष्ट म्हणजे मीराने आपण लस घेतानाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत सर्वांना लस घेण्याचं आवाहनही केलं. परंतू ही बाब प्रसारमाध्यमांमध्ये समोर येताच तिने ही पोस्ट डिलीट केली आहे.

    मीरा चोप्राने डिलीट केलेली इन्स्टाग्राम पोस्ट

    राजकारण तापले :

    दरम्यान या प्रकरणावरुन आता ठाणे शहरातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीला कोविड सेंटरमध्ये सुपरवायजरचं ओळखपत्र कोणी बनवून दिलं? कोणत्या कारणासाठी दिलं याचा तपास व्हायला हवा अशी मागणी ठाणे मनपाचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. ठाणे महापालिकेनेही या प्रकरणाची दखल घेतली असून, उपायुक्त संदीप माळवी यांनी प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं तोंडीच सांगितलं आहे.

    खासगी कंपनीकडून ओळखपत्र

    ओम साई आरोग्य केयर सेंटर या खाजगी कंपनीने मीरा चोप्रा हिला सुपरवायझर भासवून लस देण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे.ठाण्याच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड रुग्णालयात कर्मचारी पुरवण्याचं काम ओम साई आरोग्य केअर सेंटर या कंपनीकडे आहे. या कंपनीने एका सेलिब्रेटीला सुपरवायजर नेमलं का? की लस घेण्यासाठी या अभिनेत्रीला सुपरवायजरचं ओळखपत्र बनवून देण्यात आलं? पालिका आयुक्तांनी याची चौकशी करुन सर्व प्रकार समोर आणावा अशी मागणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका या प्रकरणात नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    Actress Meera Chopra get vaccinated on fake identity card

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!