प्रतिनिधी
मुंबई : मराठी अभिनेत्री मनवा नाईकला उबर टॅक्सीने प्रवास करताना धक्कादायक अनुभव आला आहे. याबाबत तिने फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये मनवाने गाडीचा क्रमांक आणि वाहनचालकाचा फोटोही दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून लवकरच उबर टॅक्सी चालकाला पकडण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी नंतर ड्रायव्हरला ताब्यात घेतले.Actress Manava Naik’s terrifying experience with an Uber driver; Police took custody
प्रवासात वाईट अनुभव
मनवा नाईकने रात्री ८.१५ ला उबेर बुक केली त्यानंतर ड्रायव्हर सतत फोनवर बोलत असल्याने तिने ड्रायव्हरला फोनवर न बोलण्याचा सल्ला दिला. वारंवार सांगून ड्रायव्हर मनमानी करत असल्याचे तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. या उबर ड्रायव्हरची पोलिसांसोबत सुद्धा हुज्जत झाली. नियम मोडले म्हणून पोलिसांनी गाडीचा फोटो काढला, त्यावर तू ५०० रुपये दंड भरणार आहेस का असे प्रश्न त्याने अभिनेत्रीला विचारला. तू फोनवर बोलत होतास म्हणून थांबवले असे सांगितल्यावर हा संबंधित ड्रायव्हर अभिनेत्रीला थांब तुला बघतो धमकी देऊ लागला.
आरडाओरड केल्यानंतर सुटका
मनवा नाईकने पुढे सांगतिले, उबर चालकाला मी गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्यायला लावली तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गाडी थांबवली. मी ड्रायव्हरला पोलीस स्टेशनला चल सांगितले तर त्याने भांडण करण्यास सुरूवात केलीय उबेर सेफ्टीला फोन केल्यावर सुद्धा हा ड्रायव्हर गाडी वेगाने चालवत होतो. त्यानंतर प्रियदर्शनी पार्कमध्ये पोहोचल्यावर मी जोरजोरात हाका मारत आरडाओरड करायला सुरूवात केली. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाच्या मदतीने माझी त्या उबेरमधून सुटका झाली आता मी सुरक्षित आहे. परंतु या प्रसंगामुळे चांगलीच घाबरले, अशी पोस्ट मनवाने फेसबुकवर लिहित आपला अनुभव शेअर केला आहे.
नेटकऱ्यांनी मनवाला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून तिने मुंबई पोलिसांनाही यात टॅग केले. विश्वास नांगरे पाटील यांनी देथील मनवाच्या पोस्टवर कमेंट करत घटनेची दखल घेतल्याचे नमूद केले आहे. या चालकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Actress Manava Naik’s terrifying experience with an Uber driver; Police took custody
महत्वाच्या बातम्या
- सोने तस्करी प्रकरणाची ईडी केस कर्नाटकात हलवायला केरळच्या डाव्या सरकारचा विरोध
- मुंबईत रस्त्यांच्या कामांसाठी 6 अर्बन डिझाईन कंसल्टंटसची निवड; शिंदे – फडणवीस सरकारने बदलला पॅटर्न; कसा तो वाचा
- वर्षा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी : राज ठाकरे यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??