विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. स्वतः त्यांनी अपघाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करताना किशोरी शहाणे यांनी लिहिले आहे की, आमच्या गाडीला अपघात झाला. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. देवाच्या कृपेने आम्हाला कुणालाही इजा झालेली नाही. Actress Kishori Shahane’s car crashes
हा फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळालेली नाही. अपघातामध्ये किशोरी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही इजा झालेली नाही. ते सर्व सुखरूप आहेत.
मावळ तालुक्यातील पवना लेक परिसरात गिरावण येथे शनिवारी रात्री अपघात झाला. मुंबईकडे येत असताना किशोरी यांच्या गाडीला हा अपघात झाला. किशोर शहाणे आणि त्यांचे कुटुंबीय गाडीत होते. ते सर्व सुखरुप आहेत.
Actress Kishori Shahane’s car crashes
महत्त्वाच्या बातम्या
- दूध संघाच्या निवडणुकीवरून शिवसेनेचे मंत्रीच भिडले, आम्हाला शिवसेना शिकवून नका म्हणत संदिपान भुमरे यांनी साधला अब्दुल सत्तारांवर निशाणा
- सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात अण्णा हजारे करणार प्राणांतिक उपोषण, अजित पवार यांना पाठविले स्मरणपत्र
- पती-पत्नीचा गंदा धंदा, ऑनलाईन वाईफ स्वॅपिंगचा व्यवसाय, पोर्न व्हिडीओ पाहून सूचली कल्पना
- काश्मीर ऐक्य दिवशी जगाचा पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तानचे टूलकिट, भारत घाबरणार नसल्याचे मंत्र्यांनी ठणकावले