स्टार प्रवाह या वाहिनीवरून मालिका होणार प्रदर्शित
विशेष प्रतिनिधी
पुणे : ” होणार सुन मी या घरची” या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली श्री ची जान्हवी आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून तेजस्वी हिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आणि छोट्या छोट्या पडद्यावरची सगळ्यात लोकप्रिय नायिका म्हणून तिला नावाजल्या गेलं. त्यानंतर अगं सुनबाई ! या मालिकेतून देखील तेजस्वीने शुभ्राच्या भूमिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली. बऱ्याच कालावधीनंतर आता तेजस्वी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर नव्या मालिकेत झळकणार आहे . Actor Tejashree Pradhan new upcoming serial.
स्टार प्रवाह या वाहिनीवरील एका मालिकेतून तिचं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदारपण होतंय .स्टार प्रवाहच्या सोशल मिडीया पेजवरुन या नव्या मालिकेविषयी घोषणा केलीय. तेजश्री व्हिडीओ शेअर करुन म्हणते.. “आपली मराठी परंपरा, आपला मराठी प्रवाह. येस. बरोब्बर ओळखलं. मी येतेय आपल्या लाडक्या स्टार प्रवाहच्या नव्या कोऱ्या मालिकेतून. खास तुमच्या भेटीसाठीआता मालिकेचं नाव, तारीख, वेळ काय ही सगळी उत्सुकता पूर्ण होणार आमच्या नव्या कोऱ्या मालिकेतून. पण त्यासाठी तुम्ही बघत राहा आपलं स्टार प्रवाह.. असा व्हिडीओ तेजश्रीने शेअर केलाय.
मालिकेचं नाव, वेळ? तेजश्रीच्या या मालिकेचं नाव आणि वेळ काय आहे, याची अधिकृत माहिती मिळाली नाहीये. तेजश्रीने नव्या मालिकेची घोषणा करताच तिच्या चाहत्यांना खुप आनंद झालाय. तेजश्रीच्या या व्हिडीओखाली तिच्या फॅन्सनी कमेंट करुन उत्सुकता दर्शवली आहे. याशिवाय तिचं अभिनंदन केलंय. एकुणच तेजश्री अग्गंबाई सासुबाई नंतर तेजश्री टी.व्ही. वर मोठ्या भुमिकेत कधी दिसणार याची चाहते वाट बघत होते. अखेर चाहत्यांची उत्सुकता पुर्ण होणार आहे.
Actor Tejashree Pradhan new upcoming serial.
महत्वाच्या बातम्या
- ईडी संचालक मुदतवाढीसाठी केंद्र पुन्हा सुप्रीम कोर्टात; आज होणार सुनावणी
- “आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल” – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास!
- निधी वाटपाची कोंडी; शिंदे – फडणवीस, भाजप श्रेष्ठींचे नियंत्रण आणि काँग्रेसचा दबाव यात अजितदादांची खरी कसोटी!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ‘भारत मंडपम’चे उद्घाटन, जाणून घ्या वैशिष्ट्ये