जाणून घ्या प्रेक्षकांचा हा लाडका कलावंत नेमका कशामध्ये आणि कोणत्या रूपात समोर येणार आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी चित्रपट विश्वातील चांगला दिग्दर्शक आणि हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओकं याच्या चंद्रमुखी आणि धर्मवीर या दोन्हीही दमदार सिनेमाना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं आणि सिनेमाचं प्रचंड कौतुकही झालं. मराठी चित्रपट विश्वात सध्या प्रसाद ओक यशाच्या शिखरावर आहे. Actor Prasad Oak Marathi New Upcoming Movie…
धर्मवीर चित्रपटातील प्रसाद ओकची धर्मवीर आनंद दिघे यांनी भूमिका. तर प्रचंड लोकप्रिय झाली. प्रसादचा त्या सिनेमांतील लुक आणि ती करारी नजरच त्या सिनेमांत बरंच काही सांगून गेली. या दोन ब्लॉकबस्टर सिनेमानानंतर प्रसाद ओक नवीन सिनेमातून आणि एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणावर आधारित “परिनिर्वाण” या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या चित्रपटामध्ये प्रसाद ओक हा एका दमदार भूमिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. दलित मित्र माजी आमदार ज्येष्ठ साहित्य नामदेव व्हटकर यांची भूमिका प्रसाद या सिनेमातं साकारणारं आहे.
या शिवाय प्रसाद आपल्याला डॉ. प्रभाकर पणाशीकर यांच्या बायोपीकमध्ये प्रमुख भूमिकेत बघायला मिळणार आहे. तर निळू फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचं तो स्वतः दिग्दर्शनं करणार आहे.
Actor Prasad Oak Marathi New Upcoming Movie…
महत्वाच्या बातम्या
- लव्ह जिहादचा प्रचार करणाऱ्या व्हायरल जाहिरातीवर VIP बॅग्जचा खुलासा जाहीर, त्याच्याशी कोणताही संबंध नाकारला
- रिफायनरी साठी नाणार ऐवजी बारसूची जागा निवडली ठाकरे – पवार सरकारनेच; उद्धव ठाकरेंनी मोदींना लिहिलेले पत्र व्हायरल!!
- ठाकरे – पवारांनी टेनिस मॅच खेळण्याएवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवणे सोपे उरलेय का??; खरे “पंच” तर बसलेत दिल्लीत!!
- दादरा आणि नगर हवेलीला पंतप्रधान मोदींनी दिली पाच हजार कोटींच्या योजनांची भेट