विशेष प्रतिनिधी
पुणे : Udayanraje Bhosale साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आवाजाची नक्कल करून बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव अली अमानत शेख असे असून, तो पुण्याचा रहिवासी आहे.Udayanraje Bhosale
अली शेख हा स्वतःला उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) असल्याचे भासवत लोकांना आमिर खानकडे पाठवत होता. “माझे काही लोक आपल्याला भेटायला येतील, त्यांना मदत करा,” अशा प्रकारचे कॉल आमिर खान यांना केला जात होता. हा प्रकार जानेवारी २०२५ पासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.Udayanraje Bhosale
या संपूर्ण प्रकरणाची शंका आमिर खान यांच्या टीमला आल्यावर त्यांनी उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. पंकज चव्हाण यांनी जेव्हा आरोपीला स्वतः फोन करून विचारणा केली, तेव्हा त्यालाही आरोपीने आपण उदयनराजे बोलतोय, असे सांगितले. त्यामुळे प्रकरणाचा खरा स्वरूप उघडकीस आले.
त्यानंतर अली अमानत शेख याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Actor Aamir Khan cheated using Udayanraje Bhosale’s voice; Shahupuri police files case
महत्वाच्या बातम्या
- Mahayuti Govt : महायुती सरकारची मोठी घोषणा- पंढरपुरातील 213 सफाई कामगारांना 600 चौरस फुटांची घरे
- एकनाथ शिंदेंशी युती करण्यासाठी आर्थिक फायदा मिळालाय का? वंचित बहुजन आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना सवाल
- आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र; कठोर कारवाईचे आदेश; पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त
- Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप