विशेष प्रतिनिधी
बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र झाले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांचे वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोठलाही अनुचित प्रकार घडला नाही.कापूस व सोयाबीन प्रश्नी आंदोलन चिघळलेले असतानाच शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बुलडाण्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.Activists of Swabhimani Shetkari Sanghatana in Buldana get angry and try to set fire to tehsildar’s vehicle
वाहन जाळण्याचा प्रयत्न करताना तहसिल कार्यालयातील एकाने बघितल्याने हा संपुर्ण प्रकार समोर आला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले होते.
१०: ४० वाजता हा प्रयत्न झाल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांना भ्रमनध्वनीवर समजल्यानंतर त्यांनी तातडीने तहसिल कार्यालय गाठले होते. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. अज्ञात व्यक्तींनी तहसिल कार्यालयात रात्री साडेदहाच्या सुमारास प्रवेश करत तहसिलदारांच्या वाहनाच्या मागील चाका जवळ ज्वलनशील द्रवाची बॉटल फोटून या वाहनास आग लावण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने तहसिल कार्यालयात रात्र पाळीवर असलेल्या एकाने हा प्रकार बघीतला. त्याने आवाज करताच अज्ञात आरोपींनी त्वरित तेथून एका दुचाकीवर पलायन केल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले. या परिसरात दोन इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आलेले असल्याने आरोपी त्यामध्ये चित्रबद्ध झाले असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आरोपींचा माग काढणे पोलिसांना शक्य होणार आहे. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. तहसिलदार रुपेश खंडारे यांनी सांगितल्यानुसार दुचाकीवर तीन व्यक्ती आल्या होत्या.ठाणेदार प्रदीप साळुंके यांनीही आपल्या सहकाºयांसह घटनास्थळ गाठत पाहणी केली. अद्याप आमच्याकडे तक्रार आली नसल्याचे ते म्हणाले. तक्रार आल्यानंतर नेमके प्रकरण काय आहे, हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
दुसरीकडे शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या घरासमोर सुरू असलेल्या त्यांच्या अन्नत्याग सत्याग्रहादरम्यान काही अज्ञातांनी पोलिसांच्या वाहनासह एका रुग्णवाहिकेवर दगडफेक करीत नुकसान केले होते. त्यानंतर हा प्रकार रात्री ११ वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय परिसरात घडला.
Activists of Swabhimani Shetkari Sanghatana in Buldana get angry and try to set fire to tehsildar’s vehicle
महत्त्वाच्या बातम्या
- चीन करू शकते अमेरिकेवर अणवस्त्र हल्ला! चीनच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने जुलैमध्ये घातली होती पृथ्वी प्रदक्षिणा
- शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप
- राजस्थानचे कॉँग्रेस सरकार पुन्हा अडचणीत, तीन मंत्र्यांनी थेट सोनिया गांधींना पत्र लिहून केली राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त
- कृषि कायदे मागे घेतल्याने कृषि सुधारणांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांची टीका
- कॅ. अमरिंदर सिंग भाजपासोबत लढविणार निवडणूक, कृषि कायद्याचा विषय नसल्याने अकाली दलही सोबत येणार