Father Stan Swamy died : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे नुकतेच त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात स्टेन स्वामी यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. Activist Father Stan Swamy died on monday, accused in Bhima Koregoan Violence
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे नुकतेच त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात स्टेन स्वामी यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 84 वर्षीय स्टेन स्वामी यांना 30 मे रोजी मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रदीर्घ उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही, त्यानंतर सोमवारी म्हणजेच 5 जुलै 2021 रोजी त्यांचे निधन झाले.
बर्याच दिवसांपासून आजारी असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांना रविवारीच व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. शनिवारीच स्टेन स्वामी यांची तब्येत खालावत चालल्याची माहिती वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली होती.
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी गतवर्षी अटक
फादर स्टॅन स्वामी यांना ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती, तेव्हापासून त्यांना तळोजा जेल रुग्णालयात ठेवण्यात आले होते. 31 डिसेंबर, 2017 रोजी पुण्यातील एल्गार परिषद कार्यक्रमात केलेल्या भाषणांच्या आधारे स्टेन स्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या दुसर्याच दिवसानंतर भीमा-कोरेगाव येथे भीषण हिंसाचार झाला, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आणि मोठा गदारोळ उडाला होता. या संपूर्ण कटात माओवाद्यांचाच सहभाग असल्याचे पुणे पोलिसांनी या प्रकरणात उघड केले होते. यासंदर्भात स्टॅन स्वामी यांना ताब्यात घेण्यात आले होते.
Activist Father Stan Swamy died on monday, accused in Bhima Koregoan Violence
महत्त्वाच्या बातम्या
- Mansoon Session 2021 : ओबीसी आरक्षणावरून टीका करणाऱ्या भुजबळांना फडणवीसांनी दाखवला आरसा
- बंडातात्यांची नजरकैदेतून सुटका करा, आषाढी पायी वारीची परवानगी द्या, वारकरी संप्रदायाचे धुळ्यात आंदोलन
- स्वप्नील आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची भाजयुमोची मागणी
- OBC इम्पिरिकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणा, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर प्रहार
- नेमणुका करता येत नसतील तर एमपीएससीच्या परीक्षा घेता कशाला?, खा. संभाजीराजेंचे राज्य सरकारवर टीकास्त्र