Monday, 12 May 2025
  • Download App
    इचलकरंजी नगरपालिकेत लाचलुचपत विभागाकडून कारवाई : नगरपालिकेतील अभियंत्यास रंगेहाथ पकडले | Action taken by Bribery Department in Ichalkaranji Municipality: Municipal engineer caught red handed

    इचलकरंजी नगरपालिकेत लाचलुचपत विभागाकडून कारवाई : नगरपालिकेतील अभियंत्यास रंगेहाथ पकडले

    विशेष प्रतिनिधी

    इचलकरंजी : इचलकरंजी नगरपालिकेमध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे. गुंठेवारीचे प्रकरण मिटवण्यासाठी नगरपालिकेतील अभियंत्यांनी 25000 रुपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून संबंधित अभियंत्याला रंगेहाथ पकडले आहे. इचलकरंजीमध्ये झालेल्या या कारवाईने नगरपालिका वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. ही कारवाई होताच सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेतच्या दारातच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.

    Action taken by Bribery Department in Ichalkaranji Municipality: Municipal engineer caught red handed

    इचलकरंजी नगरपालिकेतील नगररचना विभागाकडे गुंठेवारीची एक फाईल दिली हाेती. ही फाइल मंजूर करण्यासाठी अभियंता बबन खोत याने 25000 रुपयांची मागणी केली. अशी तक्रार करण्यात केली होती. आणखी तडजोड केल्यानंतर ही रक्कम वाढवून 20,000 पर्यंत करण्यात आली होती. आणि ही रक्कम बबन खोत यांचे साथीदार किरण कोकाटे यांच्यातर्फे स्वीकारण्यात येणार हाेती अशी माहिती लाचलुचपत विभागाला कळाली होती. त्या नंतर त्यांनी दुपारी ही रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.


    कॉँग्रेसच्या काळात लाचखोरीचे आरोप झालेल्या इटालियन कंपनी ऑगस्टा वेस्टलॅँडला संरक्षण कंपन्यांच्या यादीतून टाकले काढून


    ही कारवाई पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पुरे यांच्या नेतृत्वाखाली झाली. सध्या इचलकरंजी नगरपालिकेत कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. इचलकरंजी नगरपालिकेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लाचखोरी चालत असल्याच्या तक्रारी नोंद झाल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

    Action taken by Bribery Department in Ichalkaranji Municipality: Municipal engineer caught red handed

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!