विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रविण दरेकर यांच्यावर ‘आप’ च्या धनंजय शिंदे यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो सुडबुद्धीने नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. Action against Pravin Darekar is not revenge Claim by Mahesh Tapase
महाविकास आघाडी सरकार सूडाचे राजकारण करते म्हणून प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे असेही महेश तपासे म्हणाले.
प्रविण दरेकर यांच्याविषयी ‘आप’ चे धनंजय शिंदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र भाजप चुकीच्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार विषयी सांगत आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.