वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत महिलांशी विनयभंग आणि गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. श्रद्धा वालकर लव्ह जिहाद हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा दिल्लीतून हादरवणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीतील द्वारका येथील परिसरात एका तरुणाने विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका परिसरात एका मुलाने विद्यार्थिनीवर ऍसिड फेकले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला सफदरजंग रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. Acid attack on 12th student in Delhi; Suspect in police custody
काय आहे प्रकरण
दिल्लीत एका १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाली असून मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर दिल्लीत पुन्हा एकदा मुलीच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीतील द्वारका भागात ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दोन तरूणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हल्लाखोर आणि पीडित मुलगी एकमेकांना ओळखत होते, असे सांगितले जात आहे. पीडितेवर हा हल्ला नेमका का करण्यात आला?, याचे कारण अद्याप समोर आले नसून, दिल्ली पोलीस याचा तपास करत आहेत.
Acid attack on 12th student in Delhi; Suspect in police custody
महत्वाच्या बातम्या