विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवरची अवस्था कितीही खराब असली, तरी एकेकाळी तो पक्ष संपूर्ण देशावर राज्य करत होता आणि त्यांच्याकडे बडे बडे दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असायचे, पण काळाच्या ओघात काँग्रेसची घसरण झाली आणि हे नेते विस्मृतीत गेले. पण आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्मृतीत गेलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या दिग्गज नेत्यांना “अच्छे दिन” आले आहेत. कारण आपापल्या पक्षांची सूत्रे सांभाळणारे दोन दिग्गज नेते या दोन दिग्गज नेत्यांच्या म्हणजेच एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले नेत्यांच्या भेटीगाठीला पोहोचले.“Achche Din” to senior Congress leaders in Maharashtra’s one-time chief ministerial race; Pawar-Rahul’s meeting and questioning!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपले 40 वर्षांचे राजकीय वैर विसरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. खासदार सुप्रिया सुळे चोहोबाजूने अडचणीत सापडल्यानंतर पवारांना अनंतराव थोपटेंची भेट घ्यावी लागली. त्यांची मदत मागावी लागली.
पवार – थोपटे भेटीला दोनच दिवस उलटले. त्यानंतर भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने धुळ्यात पोहोचलेल्या राहुल गांधींनी देवपुरा गाठत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील उर्फ दाजी साहेब यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांचे सोनिया गांधींशी फोनवरून बोलणे करून दिले.
अनंतराव थोपटे आणि रोहिदास पाटील हे काँग्रेस मधले निष्ठावंत नेते म्हणून गणले जात. महाराष्ट्रात ज्यावेळी काँग्रेस प्रबळ होती, त्यावेळी अनेक वर्षे विविध मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळून राहिले होते. अनेकदा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यती देखील आले होते. पण त्यावेळी विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे आणि नंतर अशोक चव्हाण या नेत्यांनी बाजी मारली आणि अनंतराव थोपटे तसेच रोहिदास पाटलांचे नाव तेव्हा शर्यतीतून मागे पडले, तरी देखील त्यांचे राजकीय महत्त्व फारसे कमी झाले नाही. त्यांच्या वयाच्या उमेदीच्या काळात ते महाराष्ट्रभर चर्चेतच राहिलेले नेते होते.
आता अनंतराव थोपटे आणि रोहिदास पाटील या दोघांचेही वय झाले आहे. काळाच्या ओघात काँग्रेस पक्षाची घसरण एवढी झाली आहे की, त्या पक्षात आता कोणी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत संख्याबळाच्या आधारावर दावा करू शकत नाही. अन्यथा आजही पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सक्षम नेते काँग्रेसमध्ये आहेत.
पण अनंतराव थोपटे आणि रोहिदास पाटील यांची अनुक्रमे शरद पवारांनी आणि राहुल गांधींनी भेट घेतल्यामुळे त्यांची नावे परत बातम्यांमध्ये आणि चर्चेत आली. मध्यंतरी रोहिदास पाटील आजारी होते. सध्या देखील त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत, याविषयी माहिती समजताच राहुल गांधींनी वेळात वेळ काढून आपल्या पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतल्याने धुळ्यात तो चर्चेचा विषय ठरला होता.
“Achche Din” to senior Congress leaders in Maharashtra’s one-time chief ministerial race; Pawar-Rahul’s meeting and questioning!!
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारने JKNFवर पाच वर्षांसाठी बंदी घातली; जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचा होता कट
- रेल्वेच्या एकता मॉल प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- हवाई दलाचे लढाऊ विमान तेजस जैसलमेरमध्ये कोसळले
- काँग्रेसने मध्यप्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी केली जाहीर