वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे. आफताबच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरूवार सकाळी 11 वाजता सुरू झाली. तोपर्यंत आफताबचे वकील न्यायालयात पोहोचले नव्हते. यापूर्वी 17 डिसेंबर रोजी आफताबला साकेत न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. Accused Aftab Poonawala withdrew his bail application before the hearing
आफताबने न्यायालयाला सांगितले की, मला जामीन अर्ज दाखल करायचा नाही. आफताबचा जामीन अर्ज त्याच्या वकिलाच्या वतीने दाखल करण्यात आला होता, त्यानंतर न्यायालयाने म्हटले की, यासाठी आफताबची संमती आवश्यक आहे. आफताबने आपल्या वकिलाशी बोलल्यानंतर जामीन अर्ज मागे घेतला. यानंतर न्यायालयाने याचिका मागे घेण्याची परवानगी देत खटल्याची सुनावणी फेटाळून लावली आहे.
श्रद्धाच्या वडिलांच्या वकील सीमा कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने त्याच्या वकिलाला जामीन अर्ज दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याने आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तर दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयात आफताब पूनावालाच्या आवाजाचा नमुना घेण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या अर्जावर उद्या, शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
17 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, प्रेयसी श्रद्धा वालकरची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असलेल्या आफताबने न्यायालयाला असे सांगितले की, त्याला जामीन अर्जाबाबत कोणतीही माहिती नाही. त्यांनी केवळ वकलतनामावर स्वाक्षरी केली होती, मात्र जामीन अर्ज दाखल करण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्याने म्हटले आहे.
Accused Aftab Poonawala withdrew his bail application before the hearing
महत्वाच्या बातम्या
- सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत घेण्याबाबत सरकार सकारात्मक; मुख्यमंत्र्यांची घोषणा
- आदित्य ठाकरेंना ओळखत नसल्याचा रिया चक्रवर्तीचा वकिलामार्फत पुन्हा खुलासा
- रिया चक्रवर्तीला ए. यू. अर्थात आदित्य ठाकरेंचे 44 फोन कॉल; खासदार राहुल शेवाळेंचा लोकसभेत गंभीर आरोप
- चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रचंड उद्रेक, पण भारतात स्थिती नियंत्रणात; डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास