• Download App
    शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन; हरपला मराठा आंदोलनाचा बुलंद आवाज!!|Accidental death of Shiv Sangram leader Vinayak Mete; The loud voice of the Maratha movement was lost

    शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन; हरपला मराठा आंदोलनाचा बुलंद आवाज!!

    प्रतिनिधी

    पनवेल : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा हा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांना मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.Accidental death of Shiv Sangram leader Vinayak Mete; The loud voice of the Maratha movement was lost

    विनायक मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होते. मात्र मेटे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही माहिती समजतोस तातडीने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णालयात दाखल झाले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हेही रुग्णालयात दाखल झाले.



    रविवारी पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडकडून मुंबईकडे येत असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात झाल्याची माहिती त्यांचे सहकारी आणि चालक एकनाथ कदम यांनी दिली. अपघात झाल्यानंतर तब्बल एका तासानंतर मदत मिळाली असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून मेटे यांचे स्वीय सहाय्यक आणि मेटे हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त केली आहे.

     कोण होते विनायक मेटे?

    विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी आंदोलन केली.

    अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते.

    बीज जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे ते रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात ते आमदार होते. त्यानंतर सलग ५ टर्म विधान परिषद सदस्य होते.

    Accidental death of Shiv Sangram leader Vinayak Mete; The loud voice of the Maratha movement was lost

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा