• Download App
    मागण्या मान्य करा अन्यथा संपूर्ण राज्याचा वीजपुरवठा बंद करू, वीज कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा|Accept the demands or else we will cut off power supply to the entire state, Mahavitaran workers warned the

    मागण्या मान्य करा अन्यथा संपूर्ण राज्याचा वीजपुरवठा बंद करू, वीज कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

    फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या, लसीकरण, कोविड मृत्यूमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा आणि आरोग्यात विमात केलेले बदल पुन्हा पूर्वरत करण्यात यावे, अशा मागण्या वीज कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण राज्याचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे.Accept the demands or else we will cut off power supply to the entire state, Mahavitaran workers warned the


    विशेष प्रतिनिधी

    कल्याण : फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्या, लसीकरण, कोविड मृत्यूमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा आणि आरोग्यात विमात केलेले बदल पुन्हा पूर्ववत करण्यात यावे, अशा मागण्या वीज कर्मचाºयांनी केल्या आहेत.

    मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण राज्याचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे.कल्याणमध्ये वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांची भेट घेऊन निवेदन दिले.



    एसईए संघटनेचे प्रादेशिक सचिव श्रीनिवास बोबडे म्हणाले, वीज मंडळाचे 86 हजार कर्मचारी आणि अभियंते आहेत त्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांच्यासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात यावी, या मागणासाठी आम्ही राज्यभरातील सर्व आमदारांना भेटून निवेदन देत आहोत.

    आमची सहा संघटनांची एक कृती समिती आहे. या कृती समितीने 24 मे पासून कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर वीज पुरवठाही खंडीत होऊ शकतो.

    त्यामुळे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा, अशी आमची सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे. कर्मचारी आणि कुटुंब यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी आम्ही मागणी करतो आहोत.

    Accept the demands or else we will cut off power supply to the entire state, Mahavitaran workers warned the

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra Govt : संस्थांनी दिलेला निधी वापरा, नाही तर परत द्या; राज्य शासनाचा 28 फेब्रुवारपर्यंत अल्टिमेटम

    Bachchu Kadu : बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; चर्चा अयशस्वी ठरल्यास ‘रेल रोको’चा इशारा

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता