मुंबई म.न.पा प्रमाणे लवकरच राज्यातील औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव महानगरपालिकेत हा निर्णय घेतला जाणार आहे.Abolish property tax on 500-foot houses in the city; Demand of Nationalist Congress Party
विशेष प्रतिनिधी
धुळे : नुकतेच मुंबई महानगरपालिकेने ५०० फुटांच्या घरांची मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर धुळे महानगर पालिकेने धुळे शहरातील ५०० फुटांच्या घरांची मालमत्ता कर रद्द करावी,
अशा मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे महापालिका आयुक्तांसमोर सादर करण्यात आले आहे.धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मजुर, कारागीर, शेतकरी, छोटे व्यावसायिक, खाजगी कर्मचारी राहतात.
दरम्यान ५०० फुटांपर्यंत घरांची मालमत्ता कर रद्द केल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांनी व्यक्त केली आहे.तसेच मुंबई म.न.पा प्रमाणे लवकरच राज्यातील औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव महानगरपालिकेत हा निर्णय घेतला जाणार आहे.
Abolish property tax on 500-foot houses in the city; Demand of Nationalist Congress Party
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणुका वेळेवरच! : निवडणूक आयोगाचे पाचही राज्यांना पत्र, लसीकरणाला गती देण्याचे निर्देश, मणिपूरबाबत व्यक्त केली चिंता
- महादेव जानकर आता परभणीतून मैदानात; लोकसभा निवडणूक लढविणार, बारामतीला टाटा
- पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ , शाळा पुन्हा ऑनलाइन सुरू करा ; महापौर मुरलीधर मोहोळ करणार उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Breaking News : प्रसिद्ध निर्माती एकता कपूरला कोरोनाची लागण-होम क्वारंटाईन-उपचार सुरु