विशेष प्रतिनिधी
माढा : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे सगळे जुने डाव टाकून झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवे डाव टाकत पवारांच्या जुन्या डावांना काटशह दिला. याची प्रचिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आली. देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास ठेवत अभिजीत पाटील, रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि शहाजी बापू पाटील यांनी तिळगुळ घ्या गोड बोला केले!! Abhijit patil supports ranjit Singh naik nimbalkar and ram satpute trusting devendra fadnavis
बारामती पाठोपाठ माढा लोकसभा मतदारसंघ का होईना, पण तो पुन्हा आपल्या ताब्यात आल्या पाहिजे, यासाठी शरद पवारांनी मोठमोठ्या चाणक्य खेळ्या केल्याच्या आणत प्रत्यक्षात जुन्याच मोहिते पाटील घराण्याला आपल्या गळाला लावले. उत्तम जानकर यांना बाजूला बसवून घेतले. त्या पलीकडे कुठली खेळी त्या मतदारसंघात झाली नाही. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून धवलसिंह मोहिते पाटलांना भाजपच्या गोटात आणले. माळशिरस सारख्या छोट्या गावात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा लावून ती अपेक्षेबाहेर यशस्वी करून दाखविली. “जो करतो विश्वासघात, त्याचा होतो सत्यानाश”, हे उघडपणे बोलून दाखविले आणि त्यात धैर्यशील मोहिते पाटलांचे थेट नाव घेतले.
पण फडणवीस केवळ भाषण करून थांबले नाहीत. त्यांनी रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि माढा मतदारसंघातल्या प्रत्येक शिलेदाराचे संपूर्ण नेटवर्क 24 × 7 ऍक्टिव्हेट केले.
दरम्यानच्या काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आला 432 कोटी रुपयांची राज्य सहकारी बँकेची थकबाकी कारखान्याला भरता आली नाही, त्यामुळे राज्य बँकेने विठ्ठल कारखान्याच्या गोडाऊनला ठोकले. त्या गोडाऊनमध्ये 1 लाख पोती साखर असल्याचे सांगितले गेले. अभिजीत पाटील शरद पवारांच्या सभेत व्यासपीठावर हजर असताना कारखान्याच्या गोडाऊन वर बँकेने जप्तीची टांच आणल्याचे सांगितले गेले पण 432 कोटींची थकबाकी फार पूर्वीची होती. ती अभिजीत पाटलांच्या संचालक मंडळाला भरता आली नव्हती. ती थकबाकी भरण्यासाठी शरद पवारांनी मदत केल्याचेही दिसून आले नाही.
त्यामुळे अभिजीत पाटील यांनी शरद पवारांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वास्तविक 432 कोटी 25 टक्के रक्कम भरून अभिजीत पाटलांना जप्तीची टांच टाळता आली असती. परंतु ती 25% रक्कम म्हणजे साधारण 100 कोटी रुपये स्वतः अभिजीत पाटील आणि शरद पवार मिळून उभे करू शकले नाहीत. अभिजीत पाटलांनी वेळेची नाजूकता ओळखून फडणवीसांचा आश्रय घेतला. मदतीसाठी त्यांची मनधरणी केली. फडणवीसांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे हित आणि त्यांची थकबाकी देण्याची जबाबदारी लक्षात घेऊन कारखान्याला मदतीचा शब्द दिला.
फडणवीसांच्या शब्दावर विश्वास ठेवून अभिजीत पाटलांनी भाजपचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला. रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर पोहोचले आणि तिथे अभिजीत पाटील रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि शहाजीबापू पाटील यांनी तिळगुळ घ्या गोड बोला!!, असा सण साजरा केला. अभिजीत पाटलांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर रणजीत सिंह आणि शहाजी बापूंनी त्यांचे आभार मानले.
Abhijit patil supports ranjit Singh naik nimbalkar and ram satpute trusting devendra fadnavis
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या मातीत हाणली पवारांची कॉपी!!; कोण कुणाच्या हातात काय देणार??, विचारणा केली!!
- Salman Khan Firing: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीने केली आत्महत्या!
- मोदींच्या महाराष्ट्र मोहिमेनंतर योगींची दक्षिण महाराष्ट्रावर स्वारी!!; सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगलेत तुफानी सभा!!
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने EVM-VVPAT शी संबंधित प्रोटोकॉल बदलला!