प्रतिनिधी
मुंबई : शिंदे फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी 50 खोके या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या बाबत बोलताना शिवी वापरली. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळला असून मुंबई त्यांच्या शासकीय निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला. Abdul Sattar’s controversial statement against Supriya Sule
तिथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानाच्या काचा फोडल्या आपल्या वक्तव्यावरून प्रचंड संताप पाहताच अब्दुल सत्कार यांनी आधी केलेल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला.
पन्नास खोके मिळाले असतील म्हणूनच अब्दुल सत्तार यांनी आपल्याला खोके देण्याची ऑफर दिली असावी, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत शिवी वापरली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अब्दुल सत्तारांवर संतापले. दुपारनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन केली.
मुंबईत त्यांच्या निवासी शासकीय निवासस्थानी जोरदार राडा घातला व तिथल्या काचा फोडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त प्रतिक्रिया नंतर अब्दुल सत्तार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला.
Abdul Sattar’s controversial statement against Supriya Sule
महत्वाच्या बातम्या
- T-20 विश्वचषकात भारत सेमीफायनलमध्ये; नेदरलँड विरुद्ध पराभूत दक्षिण आफ्रिका पुन्हा “चोकर”
- मशाल पेटली, अंधेरी जिंकली; पण विजयात मुस्लिम मतांचा वाटा असेल तर…
- महाराष्ट्रात कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू; नोंदणी फक्त १ रुपयात
- महाराष्ट्रात मोठी नोकर भरती; आरोग्य खात्यात 10568 जागा, तर ग्रामविकास मध्ये 11000 जागा