Abdul Sattar : मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे मध्यंतरी मुख्यमंत्रिपदाचा कारभार रश्मीताई ठाकरे यांच्यावर सोपवावा, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. यावरून शिवसेनेकडूनही पलटवार करण्यात आला होता. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून हे पद आता इतरांकडे सोपवावं अशी मागणी विरोधकांनी केली होती. दरम्यान, आता शिवसेनेचेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यास कोणाचीही हरकत नसेल असं विधान केलं आहे. Abdul Sattar said, no one would mind If Rashmi Tai Thackeray become Chief Minister
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे मध्यंतरी मुख्यमंत्रिपदाचा कारभार रश्मीताई ठाकरे यांच्यावर सोपवावा, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. यावरून शिवसेनेकडूनही पलटवार करण्यात आला होता. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरून हे पद आता इतरांकडे सोपवावं अशी मागणी विरोधकांनी केली होती. दरम्यान, आता शिवसेनेचेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यास कोणाचीही हरकत नसेल असं विधान केलं आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, रश्मीताई ठाकरे यांचा अभ्यास दांडगा आहे. अनेकदा निर्णयांमध्ये त्या साहेबांसोबत असतात. त्या पडद्यामागून राजकारणाची सूत्रे सांभाळतात. यामुळे साहेबांच्या इच्छेनेच त्या मुख्यमंत्रिपदी जाण्यास कोणाचीही हरकत नसेल. रश्मीताई लोकशाहीच्या माध्यमाने लोकांपर्यंत चांगल्या योजना कशा जातील यासाठी त्यांचं नाव आहे. यामुळे उद्धवजींच्या आदेशाने त्यांना मुख्य जबाबदारी मिळू शकते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सेना-भाजप एकत्र आणण्याची चावी गडकरींकडे आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, गडकरी साहेब ज्या दिवशी मनं जुळवण्याचा खरोखर प्रयत्न करतील, त्या दिवशी नक्कीच मने जुळतील. आमचे वरिष्ठ नेते आणि गडकरी साहेब व अमित शाह यांनी पुढाकार घेतला तर नक्कीच काहीतरी घडेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेची राम-लक्ष्मणाची जोडी पुन्हा पाहायला मिळेल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, कदाचित हे होऊ शकतं. भविष्यात कदाचित असा प्रस्ताव आला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुढची आणखी अडीच वर्षे देण्याचा… आता ते देणार की नाही देणार हे मी बोलणार नाही, परंतु भाजपने असा प्रस्ताव दिला, तर नक्कीच विचार होऊ शकतो.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचा तर प्रश्नच नाही त्यांचे इतके जवळकीचे संबंध आहेत. म्हणूनच महाराष्ट्रात कोणतेही परिवर्तन करायचे असेल तर त्याची चावी म्हणजे गडकरी आहेत, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
Abdul Sattar said, no one would mind If Rashmi Tai Thackeray become Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- अब्दुल सत्तार म्हणतात, सेना-भाजपला एकत्र आणण्याची चावी गडकरींकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुढची आणखी अडीच वर्षे दिली तर….
- चीनवर भारताचा पलटवार : चीनच्या व्हिडीओला प्रत्युत्तर म्हणून भारताने जारी केले फोटो; LAC वर तिरंग्यासह 30 सशस्त्र भारतीय सैनिक तैनात
- त्यांच्या हातालाच नाही, तर मेंदूला पण लकवा मारला; चंद्रकांत पाटील यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका
- उत्तर प्रदेशातील बरेलीत “लडकी हूं” मॅरेथॉनमध्ये गर्दीत चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : सूर्यनमस्कार आयोजनास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध; मुस्लिम विद्यार्थ्यांनी सहभागी न होण्याचे आवाहन