बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे.
मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. Aaryan Khan: Mumbai Police summons Shah Rukh Khan’s manager Pooja Dadlani; Pooja says ‘I am not in good health, it will come later!’ …
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानीला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) समन्स बजावले आहे. मुंबई पोलीस किरण गोसावी खंडणी प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत पूजा ददलानीने मुंबई पोलिसांकडे आणखी वेळ मागितला आहे. पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे.
हॅकर मनीष भंगाळेचे दावे आणि गौप्यस्फोट
यापूर्वी, एका सायबर तज्ञाने आणि हॅकरने दावा केला होता की, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यासाठी पूजा ददलानीसह काही लोकांच्या व्हॉट्सअॅप चॅट्स एडिट करण्यासाठी दोन लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मनीष भंगाळे असे या हॅकरचे नाव आहे. दाखवलेल्या व्हॉट्सअॅप चॅटची बॅकअप फाइल आर्यन खानच्या नावावर असल्याचा दावा भंगाळे यांनी केला होता.
प्रभाकर साईलच्या नावाने बनावट सिमकार्ड बनविण्यास सांगितले होते, असा मोठा दावा हॅकर मनीष बंगाळेने केला होता. जळगावात 6 ऑक्टोबरला आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या दोघांनी माझ्याशी संपर्क साधला होता. यासाठी मला पाच लाख रुपयांची ऑफरही देण्यात आली होती तसंच जबरदस्तीने 10 हजार रुपयेही देण्यात आले होते, असे दावे भंगाळेंनी केले होते.
मनीष भंगाळेंचं अमित शहा, वळसे पाटील आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र
गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये प्रभाकर साईलबद्दलच्या बातम्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनीष भंगाळे यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. मनीष भंगाळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसंच महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना पत्र लिहिले आहे.
भंगाळे म्हणाले, आलोक जैन आणि शैलेश चौधरी नावाच्या या दोघांनी मला सांगितले की, तू भारतातील प्रसिद्ध हॅकर आहेस. तुमच्याकडे आमचं एक विशेष काम आहे. त्यांनी मला काही नंबर दिले आणि सांगितले की आम्हाला त्यांचा सीडीआर हवा आहे. त्या सर्व क्रमांकांपैकी एक नंबर पूजा ददलानी या नावाने सेव्ह करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मला व्हॉट्सअॅप चॅटची बॅकअप फाईल दाखवली आणि त्या फाईल्स एडिट करण्यास सांगितल्या. त्यानंतर त्यांनी मला एक मोबाइल नंबर दिला आणि या नंबरवर कॉल करण्यास सांगितलं आणि जेव्हा मी तो नंबर ट्रूकॉलरवर पाहिला तेव्हा हा नंबर काही सॅमचा होता.
Aaryan Khan : Mumbai Police summons Shah Rukh Khan’s manager Pooja Dadlani; Pooja says ‘I am not in good health, it will come later!’ …
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल