Wednesday, 7 May 2025
  • Download App
    AARYAN KHAN CASE NEW TWIST : लाव रे तो व्हिडिओ: किरण गोसावी हा राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर ; मोहित कंभोज यांचा मोठा गौप्यस्फोट । AARYAN KHAN CASE NEW TWIST: Laav Re To Video: Kiran Gosavi is NCP's Sunil Patil's punter; Mohit Kambhoj's big blast

    AARYAN KHAN CASE NEW TWIST : लाव रे तो व्हिडिओ: किरण गोसावी हा राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर ; मोहित कंभोज यांचा मोठा गौप्यस्फोट

    भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील ड्रग्ज पार्टी आणि पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती AARYAN KHAN CASE NEW TWIST: Laav Re To Video: Kiran Gosavi is NCP’s Sunil Patil’s punter; Mohit Kambhoj’s big blast


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील ड्रग्ज पार्टी आणि पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती केलीय. किरण गोसावी हा सुनील पाटीलचा माणूस असल्याचा दावा कंबोज यांनी केला. तर, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तो पक्षाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांशी त्याचे संबंध कसे काय?, असा सवाल देखील कंबोज यानी केला आहे.

    राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून तो पक्षाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांशी त्याचे संबंध कसे काय?

    सुनील पाटील मास्टरमाईंड

    सहा तारखेला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देशातील मीडियासमोर साक्षीदार, एनसीबी आणि भाजप कार्यकर्त यांचा संबध आहे यासंदर्भातील फोटो माध्यमांसमोर ठेवले. काही व्यक्तिमत्व किरण गोसावी, सॅम डिसूझा आणि मनीष भानूशाली हे प्रभाकर साईल याच्या प्रतिज्ञापत्रातून समाोर आले. मी आज या प्रकरणातील व्हाटस अप चॅट, ऑडिओ क्लिप हे प्रेझेटेशनच्या रुपात समोर मांडणार आहे, असं मोहित कंबोज म्हणाला. मोहित कंबोज यानं किरण गोसावीचे फोटो माध्यमासमोर मांडले. किरण गोसावी कोण आहेत. मनीष भानुशाली कोण आहे?, कोण आहे प्रभाकर साईल? असा सवाल मोहित कंबोज यांनी विचारला. त्यापूर्वी सुनील पाटील कोण आहेत असा सवाल मोहित कंबोज यांनी केला. या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहेत. गेल्या 20 वर्षांपासून सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाशी सुनील पाटील यांचा संबंध होता. आर.आर.पाटील यांच्याशी देखील सुनील पाटील यांचा संबंध होता.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मत्र्यांशी सुनील पाटील यांचा संबंध होता. सुनील पाटील महाराष्ट्रात 1999 ते 2014 पर्यंत सक्रिय होते. सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. 2014 ला सरकार गेल्यानंतर पाटील अंडरग्राऊंड झाले होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सुनील पाटील सक्रिय झाला. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तो बसायचा.

    आर्यन खान प्रकरणाशी संबंध काय?

    हे प्रकरण 1 ऑक्टोबर पासून सुरु होती. सुनील पाटील यांनी सॅम डिसुझाला 1 तारखेला व्हॉटस अप कॉल केला. माझ्याकडे 27 लोकांची माहिती आहे, एनसीबीशी संपर्क करुन द्या. मुंबईत क्रुझ पार्टी होणार असल्याची माहिती दिली. सॅम डिसुझानं व्ही. व्ही. सिंग यांच्याशी संपर्क केला. सॅम डिसुझा यांनी देशासाठी कोणतं काम करायचं असेल तर ती द्यावी म्हणून सिंग यांच्याशी संपर्क केला. यानंतर सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्याशी संपर्क केला.
    2 ऑक्टोबरला सुनील पाटील यांनी माझा माणूस तुझ्याशी बोलेल असं सॅम डिसुझाला सांगितलं. तो व्यक्ती किरण गोसावी होता. किरण गोसावी संपूर्ण माहिती एनसीबी अधिकारी व्ही. व्ही. सिंग यांना देतील. एनसीपीच्या सदस्यांकडे ड्रग्जची पार्टी कशी होणार याची माहिती कशी आली हा प्रश्न असल्याचं मोहित कंबोज म्हणाले.



    मंत्री एनसीबीच्या अधिकाऱ्याचा विरोध करता करता देशाचा विरोध करायला लागला

    सॅम डिसुझा यांनी सुनील पाटील यांच्या बोलण्यावर किरण गोसावीला व्ही. व्ही. सिंग नावाच्या अधिकाऱ्याशी भेटवलं. ज्या प्रकारे गेल्या महिन्यापासून एक नवं नरेटिव्ह, भाजपचे लोक छाप्यात सहभाग असणं,छाप्यात भाजपचे लोक साक्षीदार असणं असं प्रकरण तयार करण्यात आलं. हा कोणता पिक्चर तयार करण्यात आला. एनसीबी ड्रग्ज फ्री नेशनची मोहीम राबवते, मात्र, ड्रग्ज फॉर नेशनची मोहीम कोणत्या मंत्र्यानं राबवली. किरण गोसावीनं सॅम डिसुझा यांना धमकी दिली. किरण गोसावी आणि सॅम डिसुझा यांच्यात एक बातचीत ऑगस्ट महिन्यात झाली. मी एक ऑडिओ क्लिप जारी करणार आहे. सुनील पाटील त्यामध्ये तो राजकारण्यांशी किती संबंध आहे हे सांगत आहे. सुनील पाटील याचा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याशी संबंधित का होते? एका अधिकाऱ्याला बदनाम करायचं आहे का? एनसीबीला बदनाम करायचं आहे का? ड्रग्ज सिंडिकेट चालवायचं आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसनं याचा खुलासा करावा, असं मोहित कंबोज म्हणाले.

    नवाब मलिक यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना

    मोहित कंबोज यानं एक कथित ऑडिओ क्लिप जारी केली त्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख आढळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्र्याशी संपर्क कसा काय? किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा व्यक्ती आहे. सुनील पाटील, किरण गोसावी हे मोठमोठ्या लोकांसोबत भेटतात फोटो काढतात आणि सिंडीकेट करतात. एक खोटं प्रकरण उचलून धरण्याचं काम एका मंत्र्याकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे संबंधित मंत्री अधिकाऱ्याचा विरोध करता करता देशाचा विरोध करायला लागला का? असा सवाल मोहित कंबोज यांनी म्हटलंय.

    AARYAN KHAN CASE NEW TWIST: Laav Re To Video: Kiran Gosavi is NCP’s Sunil Patil’s punter; Mohit Kambhoj’s big blast

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    अहिल्यादेवींच्या जीवन चरित्रावर भव्य चित्रपट निर्मिती; चौंडी मध्ये फडणवीस मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक बैठकीत निर्णय!!