• Download App
    आम आदमी पार्टी महाराष्ट्रात भाजप विरुद्ध आक्रमक; पण मते मात्र "खाणार" महाविकास आघाडीची AAP Maharashtra: Aam Aadmi Party is aggressive against BJP in Maharashtra

    AAP Maharashtra : आम आदमी पार्टी महाराष्ट्रात भाजप विरुद्ध आक्रमक; पण मते मात्र “खाणार” महाविकास आघाडीची!!

    आम आदमी पार्टीने दिल्लीपाठोपाठ पंजाब सारख्या पूर्ण राज्यामध्ये प्रचंड बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षापेक्षा आम आदमी पार्टीचा राजकीय आत्मविश्‍वास दुणावला आहे. त्यातूनच देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये आम आदमी पार्टीने भाजप विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. असाच आक्रमक पवित्रा घेत आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आंदोलन करायला सुरुवात केली आहे.AAP Maharashtra: Aam Aadmi Party is aggressive against BJP in Maharashtra

    आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातले पहिले आंदोलन मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांच्या विरोधात केले, तर दुसरे आंदोलन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उस्मानाबाद मध्ये केले. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात स्वतंत्रपणे निवडणुका लढवू इच्छित आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभा निवडणूकीत आणि जेव्हा केव्हा होतील तेव्हा महापालिका आणि स्थानिक निवडणुकांमध्ये उतरण्याचा निश्चय केला आहे. म्हणूनच आम आदमी पार्टीने आपले राजकीय टार्गेट भाजपच ठेवले आहे.



    – टार्गेटवर भाजप पण

    परंतु याचा दुसरा राजकीय अर्थ असा की आम आदमी पार्टी ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याच मतदानामध्ये वाटेकरी ठरणार आहे… म्हणजेच एक प्रकारे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यात भाजपा विरोधातले मतदान विभाजित होण्याची शक्यता आहे. सरळ भाषेत बोलायचे झाले तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मते काही प्रमाणात का होईना पण आम आदमी पार्टी खाणार आहे…!!

    – शिवसेने विरोधात आंदोलन नाही

    वास्तविक मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेवर आहे. आम आदमी पार्टी मुंबई महापालिका निवडणुका लढवू इच्छित आहे. त्यामुळे पार्टीने शिवसेने विरुद्ध आंदोलन करणे स्वाभाविक ठरले असते. परंतु आम आदमी पार्टीने प्रवीण दरेकर यांच्यासारख्या भाजप नेत्याच्याविरोधात आंदोलन करण्याची निवड केली. उस्मानाबादेत देखील राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार विरुद्ध आंदोलन न करता आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केले.

    – मत विभाजनाचा उघड फायदा कोणाचा?

    याचा उघड अर्थ असा आहे की आम आदमी पार्टीचे राज्य की टार्गेट सेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत विरोध करत राहायचा हे त्यांनी धोरण म्हणून निश्चित केले आहे. अर्थातच त्यामुळे आम आदमी पार्टी जर महाराष्ट्रात एक विशिष्ट राजकीय शक्ती म्हणून उदयाला येत असेल, तर प्रत्यक्ष मतदानात मात्र महाविकास आघाडीलाच छेद देताना दिसणार आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीची मते जर वाटेकरी म्हणून महान आदमी पार्टी खाणार असेल तर त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल…??, हे सांगायला फार मोठ्या राजकीय ज्योतिषाची गरज नाही…!! एवढे मात्र निश्चित.

    AAP Maharashtra: Aam Aadmi Party is aggressive against BJP in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!