विशेष प्रतिनिधी
पुणे : आज सर्वत्र गणेशोत्सव मोठया जल्लोषात साजरा केला जात आहे. सगळीकडे भक्तीमय आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण आज बाप्पाचं स्वागत करत आहेत. aai kuthe kay karate ganesh chaturthi festival
कलाकारांनीही त्याच्या घरी बसविण्यात आलेल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्यातच आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी देखील गणरायाचा एक खास व्हिडिओ शेयर केला आहे.
आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भुमिका साकारुन घरोघरी प्रसिद्ध झालेले मिलिंद गवळी यांनी या मालिकेच्या सेटवरच्या गणरायाचा व्हिडिओ शेयर केला आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर “चांद्रयान 3” चा देखावा करण्यात आला आहे. यात LVM3 चे रॉकेट ही दिसत आहे.
खुप उत्तम देखावा मालिकेच्या सेटवर करण्यात आला आहे.या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलयं की, “गणपती बाप्पा मोरया”आमच्या “आई कुठे काय करते” या स्टार प्रवाह वरच्या मालिकेच्या सेटवरचागणपती बाप्पाचं आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालं आहेआमच्या मालिकेचे सर्वेसर्वा राजन जी शाही , यांच्या हस्ते पूजा करून गणपती बाप्पाची स्थापना केली,
aai kuthe kay karate ganesh chaturthi festival
महत्वाच्या बातम्या
- Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 रोजीच; पंचांग कर्ते मोहन दातेंचा खुलासा
- विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थींची त्रिस्तरीय पडताळणी; अर्थमंत्री म्हणाल्या- एमएसएमई मंत्रालय हमीशिवाय ₹ 3 लाखांचे कर्ज देणार
- गुगलच्या सह-संस्थापकाचा पत्नी शानाहानशी घटस्फोट; एलन मस्कशी अफेअरची चर्चा
- CJI चंद्रचूड म्हणाले- तुम्ही सर्वांना मूर्ख बनवू शकता, पण स्वतःला नाही; वकिलांना म्हणाले- तुमची भरभराट होईल की नाही हे तुमच्या प्रामाणिकपणावर अवलंबून