भुगाव येथील श्री छत्रपती शिवाजी जलाशयामध्ये बुडून तरुणाचा मत्यू झाला. दत्तात्रय मोतीराम मिसाळ ( ३८, रा. शिवाजी नगर पुणे) असे त्याचे नाव आहे. मृतदेह ९५ तासांनी शोधून काढण्यात पौड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना यश आले आहे. हा तरुण दारू पिऊन पाण्यात उतरून फोटोसेशन करीत होता. A young man drowned while having a photo session in a lake after drinking alcohol
विशेष प्रतिनिधी
पुणे : भुगाव येथील श्री छत्रपती शिवाजी जलाशयामध्ये बुडून तरुणाचा मत्यू झाला. दत्तात्रय मोतीराम मिसाळ ( ३८, रा. शिवाजी नगर पुणे) असे त्याचे नाव आहे. मृतदेह ९५ तासांनी शोधून काढण्यात पौड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना यश आले आहे. हा तरुण दारू पिऊन पाण्यात उतरून फोटोसेशन करीत होता.
सोमवारी भुगाव जलाशयाच्या कडेला मनोज भीमराव नगरकर (वय ५०, रा. गोखले नगर, पुणे), महेश नागनाथ अवघडे (वय २८, रा. शेलार कॉम्प्लेक्स पौड रोड), योगेश सुरेश गुणवंत (वय ४२, रा. गोखलेनगर) आणि दत्तात्रय मोतीराम मिसाळ (वय अंदाजे ३८, रा. शिवाजी नगर पुणे) हे चौघे जण दारू पिण्यासाठी बसले होते. यातील दत्तात्रय मिसाळ हा फोटोसेशन करण्यासाठी पाण्यात उतरला. त्याचा पाय एका ठिकाणी घसरल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी १०० नंबरवर फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली.
पौड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीने त्याचा शोध घेतला. चार दिवस शोध घेऊनही दत्तात्रयचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर गुरूवारी (दि. २०) सकाळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे व त्यांच्या पथकाने दत्तात्रय याचा मृतदेह शोधून काढला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. मृतदेह शोधकामी पोलिस हवालदार अनिता रवळेकर, निवास जगदाळे, भुकूमचे पोलिस पाटील सतीश गुजर यांनी मदत केली.
A young man drowned while having a photo session in a lake after drinking alcohol
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी उत्तर प्रदेशात उमेदवार किती?, माहिती नाही; पण स्टार कॅम्पेनरची 26 जणांची यादी!!
- केंद्राकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे : 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी मास्क घालणे बंधनकारक, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर स्टिरॉइड्सने उपचारांना मनाई
- T-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर : भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत, 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार सामना