• Download App
    लातूरला पार पडला अनोखा सोहळा ; लेकाच्या शाही विवाहाचा खर्च टाळून 22 जोडप्यांचा फुलवला संसार , लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चाA unique ceremony was held at Latur; The world of 22 couples flourished by avoiding the cost of boy's royal wedding, the wedding ceremony was discussed everywhere

    लातूरला पार पडला अनोखा सोहळा ; लेकाच्या शाही विवाहाचा खर्च टाळून 22 जोडप्यांचा फुलवला संसार , लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा

    लातूरमध्ये सध्या या लग्नसोहळ्याची चर्चा सुरू सर्वत्र सुरू असून अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.A unique ceremony was held at Latur; The world of 22 couples flourished by avoiding the cost of boys royal wedding, the wedding ceremony was discussed everywhere


    विशेष प्रतिनिधी

    लातूर : लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून अनेक लोक सामाजिक बांधिलकी जपताना दिसतात. अशीच एक घटना लातूरमधून समोर आली आहे. लातूरमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या मुलाच्या लग्नातील अनावश्यक खर्च टाळून अन्य 22 जोडप्यांचा विवाह लावून दिला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी संसार उपयोगी वस्तूंची भेट देखील दिली आहे. लातूरमध्ये सध्या या लग्नसोहळ्याची चर्चा सुरू सर्वत्र सुरू असून अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    दरम्यान, कोरोना संसर्गामुळे व्यवसाय आणि नोकऱ्यांमध्ये घट झाल्याने अनेकांची आर्थिक गणितं बिघडली आहेत. अशात मुलीचं किंवा मुलाचं लग्न करणं म्हणजे मोठं धाडसाचं काम होतं. पण सरफराज मणियार यांनी समाजातील गरजू लोकांची ही गरज लक्षात घेत, सामाजिक बांधिलकी राखत हा विवाह सोहळा पार पाडला आहे. लातूर जिल्ह्यात सध्या या अनोख्या लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.



    काही दिवसांपूर्वी सरफराज यांच्या मुलाचा विवाह ठरला होता. शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळला आहे. त्यांनी शहरातील 22 गरीब मुस्लीम जोडप्यांचा विवाह लावून दिला आहे. त्यांनी राबवलेला हा उपक्रम सध्या लातूरमध्ये चर्चेचा विषय ठरत असून अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.याबाबत माहिती देताना सरफराज यांनी सांगितलं की, अशाप्रकारे सामूहिक विवाह सोहळा करावा अशी मुलाची इच्छा होती.

    त्याच्या इच्छेनुसारच हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. खरंतर, श्रीमंत असो किंवा गरीब मुस्लीम धर्मात साध्या पद्धतीनं लग्न करावं, असं सांगितलं जातं. तरीही काहीजण मोठा शाही विवाह करतात. पण आम्ही मुलाच्या लग्नात होणारा अनावश्यक खर्च टाळून हा सामूहिक विवाहाचं आयोजन केलं होतं.

    A unique ceremony was held at Latur; The world of 22 couples flourished by avoiding the cost of boy’s royal wedding, the wedding ceremony was discussed everywhere

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!